बा देवा महाराजा! 'कोकण हार्टेड गर्ल'ने शेअर केला पॅराग्लायडिंगचा थरारक अनुभव, व्हिडीओ बघाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 13:42 IST2025-05-30T13:39:53+5:302025-05-30T13:42:13+5:30
'बिग बॉस मराठी' फेम अंकिता वालावलकर गेल्या काही दिवसांपासून तिच्या इंटरनॅशन टूरमुळे चर्चेत आहे.

बा देवा महाराजा! 'कोकण हार्टेड गर्ल'ने शेअर केला पॅराग्लायडिंगचा थरारक अनुभव, व्हिडीओ बघाच!
Ankita Walawalkar : 'कोकणकन्या', 'बिग बॉस मराठी' फेम अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) गेल्या काही दिवसांपासून तिच्या इंटरनॅशन टूरमुळे चर्चेत आहे. सध्या अंकिता आणि तिचा पती कुणाल भगत परदेशवारी करत असून सध्या ते स्वित्झर्लंडमध्ये आहेत. याचदरम्यान स्वित्झर्लंडमध्ये तिने पॅराग्लायडिंग करतानाचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
अंकिता वालावलकर सोशल मीडियावर कमालीची सक्रिय आहे. या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नुकतीच अंकिता परदेशात गेली असून त्या दरम्यानची प्रत्येक अपडेट ती शेअर करताना दिसते आहे. अशातच नुकताच तिने स्वित्झर्लंडमधील पॅराग्लायडिंगचा अनुभव व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत तिने लिहिलंय की, "हा पॅराग्लायडिंगचा अनुभव स्वित्झर्लंडमधील एका सुंदर आठवड्याचा परिपूर्ण शेवट होता! @paraglidinginterlaken टीमने पॅराग्लायडिंग दरम्यान आम्ही आरामदायी आणि सुरक्षित आहोत, याकडेही काटेकोरपणे लक्ष दिलं. आमचे प्रशिक्षक खूप मैत्रीपूर्ण होते आणि आम्हाला शक्य तितका सर्वोत्तम अनुभव मिळावा अशी त्यांची इच्छा होती, आणि आम्हाला तो अनुभव मिळाला." अशी पोस्टलिहून अंकिताने तिच्य मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, कोकण हार्टेड गर्ल अंकिताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. तिच्या या व्हिडीओवर एका चाहत्याने चक्क मालवणीमध्ये कमेंट करत म्हटलंय, तू खयाव जाऊन कायव करू शकतेस..., तर आणखी एका नेटकऱ्याने जय महाराष्ट अशी प्रतिक्रिया देत अंकिताचं कौतुक केलं आहे.