"आम्ही मूर्ख होतो, सूरजला गेम आधीच कळला होता...", अंकिता वालावलकर स्पष्टच बोलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 11:42 IST2026-02-20T11:41:25+5:302026-02-20T11:42:07+5:30
'बिग बॉस मराठी ५'मध्ये सूरज चव्हाणच गेमचा मास्टरमाइंड होता, असं वक्तव्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिता वालावलकरने केलं आहे.

"आम्ही मूर्ख होतो, सूरजला गेम आधीच कळला होता...", अंकिता वालावलकर स्पष्टच बोलली
'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. हा खेळ खेळण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि जिंकण्यासाठी अनेकदा माइंडगेम खेळावे लागतात. याआधीच्या पर्वात असे काही स्पर्धक होते जे मास्टरमाइंड होते. 'बिग बॉस मराठी ५'मध्ये सूरज चव्हाणच गेमचा मास्टरमाइंड होता, असं वक्तव्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिता वालावलकरने केलं आहे.
अभिजात मराठीच्या राऊंड टेबलमध्ये बिग बॉस मराठीच्या पहिल्या ५ पर्वातील स्पर्धक सहभागी झाले होते. या चर्चेत अंकिता वालावालकरने सहभाग घेतला होता. यामध्ये ती म्हणाली, "आम्हाला वाटलेलं की सूरजला गेम कळत नाहीये. पण त्याला गेम खूप आधीच कळला होता. आणि आम्हाला हे बाहेर आल्यावर कळलं की त्याला गेम खूप आधीच कळला आहे. त्यामुळे तो खरा मास्टरमाइंड होता. त्याला सगळं कळत होतं. त्याला हेही माहीत होतं की स्वत:ला कसं दाखवायचं आहे. आणि आम्ही आपलं त्याला नाही कळत आहे का तुला आम्ही समजावतो, असं करत राहिलो. जेव्हा आम्ही बाहेर आलो त्याला ऑफ कॅमेरा भेटलो बोललो... तेव्हा कळलं की त्याला गेम खूप आधी कळलाय. आमच्याही आधी त्याला गेम कळला होता. आम्हा मूर्ख होतो. त्यामुळे मास्टरमाइंड हा सूरजच होता".
अंकिता वालावलकर 'बिग बॉस मराठी ५'मध्ये सहभागी झाली होती. ती टॉप ५ स्पर्धकांपैकी एक होती. तर सूरज चव्हाण या पर्वाचा विजेता होता. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील साधा भोळा सूरज चव्हाण हा प्रेक्षकांना आवडला होता. हे पर्व जिंकल्यानंतर सूरजचा 'झापुक झुपूक' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.