कोल्हापूरात 'डीपी दादा'च्या भेटीला आली लाडकी बहिण, होणाऱ्या नवऱ्यासह पोवार कुटुंबाची घेतली भेट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 16:58 IST2024-10-31T16:57:53+5:302024-10-31T16:58:13+5:30
अंकिता थेट कोल्हापूरात पोहचल्याचं पाहायला मिळालं.

कोल्हापूरात 'डीपी दादा'च्या भेटीला आली लाडकी बहिण, होणाऱ्या नवऱ्यासह पोवार कुटुंबाची घेतली भेट!
'बिग बॉस मराठी' (Bigg Boss marathi) च्या पाचव्या पर्वात कोकणकन्या अंकिता वालावकर (Ankita Walawalkar) सहभागी झाली होती. आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे अंकिताने प्रेक्षकांची मनं जिंकली. शिवाय तिच्या दमदार खेळीमुळे कोकण हार्टेड गर्लने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होत. बिग बॉसच्या घरात अंंकिता आणि धनंजय पोवार यांची मैत्री चांगलीच गाजली होती. हे दोघं एकमेकांना बहीण-भाऊ मानतात. आता अंकिता थेट कोल्हापूरात पोहचल्याचं पाहायला मिळालं.
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर अंकिता आणि धनंजय हे नाती जपताना दिसत आहेत. यापूर्वी त्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला होता. आता अंकिता वालावलकर आपल्या होणारा नवरा कुणाल भगतसह थेट कोल्हापुरात पोहचली. अंकिताने लाडक्या डीपी दादासह संपुर्ण पोवार कुटुंबाची भेट घेतली.
व्हिडीओमध्ये अकिंता लाडक्या डीपी दादाला समोर बघताच घट्ट मीठी मारताना दिसते. अंकिता डीपीच्या आई व बाबांनाही भेटली. त्यांच्या पाया पडून अंकिताने आशीर्वाद घेतले. या भेटीचे व्हिडीओ अंकिताने सोशल मीडियावरुन पोस्ट केले आहेत.
'बिग बॉस मराठी ५'नंतर यामध्ये सहभागी झालेले स्पर्धक विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत आहेत. त्याबरोबरच ते अनेकविध माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. या पर्वात कलाकारांबरोबरच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरदेखील सहभागी झाले होते. आता ते इतर कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.