अंकिता लोखंडे होणार Bigg boss 17 ची विजेती?; म्हणाली, 'सक्सेस पार्टीमध्ये 'या' दोघांना बोलणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 20:29 IST2024-01-28T20:26:57+5:302024-01-28T20:29:05+5:30

Ankita lokhande: अंकिता यंदाच्या पर्वाची विजेती होणार का?

Ankita Lokhande will be the winner of Bigg boss 17?She said In the success party..' | अंकिता लोखंडे होणार Bigg boss 17 ची विजेती?; म्हणाली, 'सक्सेस पार्टीमध्ये 'या' दोघांना बोलणार नाही'

अंकिता लोखंडे होणार Bigg boss 17 ची विजेती?; म्हणाली, 'सक्सेस पार्टीमध्ये 'या' दोघांना बोलणार नाही'

'बिग बॉस 17 ' च्या धमाकेदार ग्रँड फिनाले सोहळ्याला अखेर सुरुवात झाली आहे. या फिनालेमध्ये टॉप 5 स्पर्धकांमधून एकाची विजेता म्हणून निवड होणार आहे. त्यामुळे यंदाची ट्रॉफी कोणाच्या पदरात पडेल याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. यामध्येच मुनव्वर फारुकी आणि अंकिता लोखंडे या दोघांमध्ये काटे की टक्कर असल्याचंही दिसून येत आहे. विशेष म्हणजे या ग्रँड फिनालेमध्येच अंकिताने असं काही वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे तीच यंदाच्या पर्वाची विजेती होणार की काय असं प्रेक्षकांना वाटू लागलं आहे.

बिग बॉसच्या ग्रँड फिनाले सोहळ्याला सुरुवात झाल्यामुळे या कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी अनेक कलाकार हजेरी लावत आहेत. यामध्ये नुकतीच ओरी आणि भारती सिंह सहभागी झाले होते. यावेळी या दोघांनी घरातील स्पर्धकांना एक टास्क दिला. त्यानुसार, बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर होणाऱ्या सक्सेस पार्टीत विजेता कोणत्या स्पर्धकाला बोलावणार नाही? असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अंकिताने या घरातील २ स्पर्धकांचं नाव घेतलं. तर, मुनव्वरने सुद्धा त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचं नाव घेतलं.

'काका मला प्लीज जाऊ द्या..'; वयाच्या ९ व्या वर्षी bigg boss 17 फेम अभिनेत्रीवर झाला बळजबरीचा प्रयत्न, सांगितली आपबिती
 

"खरं तर ट्रॉफी जिंकल्यानंतर होणाऱ्या पार्टीत विकीला बोलावू नये असंच मला वाटतंय. पण, ते शक्य नाही. कारण, मी त्याच्याशिवाय पार्टी करु शकत नाही. तो नक्कीच माझ्याशिवाय करु शकतो. पण मी नाही करु शकतं. त्यामुळे जर मी पार्टी दिली तर माझ्या पार्टीत नील आणि ऐश्वर्या या दोघांना मी बोलावणार नाही", असं अंकिता म्हणाली.

Bigg boss 17: प्राइज मनीपेक्षा कैकपटीने जास्त आहे भाईजानची फी; एका एपिसोडसाठी घेतलेत इतके कोटी रुपये
 

दरम्यान, अंकिताप्रमाणेच मुनव्वरने सुद्धा आयशा खानला त्याच्या पार्टीत बोलावणार नाही असं सांगितलं. 'या घरात जे काही झालं ते इथेच राहू दे. आणि, या शोच्या बाहेर सुद्धा एकमेकांचे चेहरा पाहू नयेत असंच मला वाटतं.'
 

Web Title: Ankita Lokhande will be the winner of Bigg boss 17?She said In the success party..'