'चर्चगेटवर फास्ट ट्रेनमधून उतरताना पडले अन्...' अंकिता लोखंडेने सांगितला भयानक किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 06:03 PM2024-03-03T18:03:20+5:302024-03-03T18:04:25+5:30

अंकिताचा झाला होता भयानक अपघात

Ankita Lokhande terrific accident when she fell from local train some years ago | 'चर्चगेटवर फास्ट ट्रेनमधून उतरताना पडले अन्...' अंकिता लोखंडेने सांगितला भयानक किस्सा

'चर्चगेटवर फास्ट ट्रेनमधून उतरताना पडले अन्...' अंकिता लोखंडेने सांगितला भयानक किस्सा

'पवित्र रिश्ता' मालिकेतून अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) घराघरात पोहोचली. 'बिग बॉस 17' मध्ये ती पती विकी जैनसोबत सहभागी झाली होती. अंकिता फिनालेमध्ये टॉप 4 पर्यंतच मजल मारु शकली. तरी ती टीव्हीवरची सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात अंकिता मुंबईत लोकलनेच प्रवास करायची. मात्र एक दिवस तिचा अक्षरश: जीवघेणा अपघात झाला होता जो अंकिताच्या आजही डोक्यातून गेलेला नाही. 

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिता म्हणाली, "मी मुंबईत लोकलने प्रवास करणं बंद केलं होतं कारण माझा एक मोठा अपघात झाला होता. मला ट्रेनची आधीपासूनच भीती वाटते. एकदा मी लोकलमधून पडले होते. चर्चगेट स्थानकातून निघणाऱ्या फास्ट ट्रेनमध्ये मी चढले आणि माझे मित्र स्लो ट्रेनमध्ये चढले. ते मला आवाज देऊन उतर असं म्हणाले आणि मी उडी मारली. तेव्हाच मी जोरात पडले आणि अक्षरश: माझा जीव वाचला. तो माझा ट्रेनमधला शेवटचा प्रवास होता. तसंही मला लहानपणापासूनच ट्रेनची भीती वाटते."

अंकिता लोखंडे मध्य प्रदेशच्या इंदोरची राहणारी आहे. गेल्या २० वर्षांपासून ती मुंबईतच कुटुंबासोबत राहते. 'पवित्र रिश्ता' या मालिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. अनेक वर्ष ही मालिका चालली. इथेच तिला सुशांतसिंह राजपूत भेटला. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लिव्ह इन मध्ये राहू लागले. मात्र सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर काही वर्षांनी त्यांचं नातं तुटलं. २०२० मध्ये सुशांतच्या आत्महत्येनंतर तिला मोठा धक्का बसला. बॉयफ्रेंड विकी जैनने तिला सावरलं. नंतर अंकिता विकीसोबत लग्नबंधनात अडकली. आज दोघंही सुखाचा संसार करत आहेत.

Web Title: Ankita Lokhande terrific accident when she fell from local train some years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.