Ankita Lokhande : गरोदर आहे अंकिता लोखंडे?, अभिनेत्रीनं लपवला बेबी बम्प, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 17:10 IST2023-05-25T13:36:26+5:302023-05-30T17:10:13+5:30
पवित्रा रिश्ता फेम अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते.

Ankita Lokhande : गरोदर आहे अंकिता लोखंडे?, अभिनेत्रीनं लपवला बेबी बम्प, फोटो व्हायरल
टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिला चर्चेत राहणं चांगलंच जमतं. या ना त्या कारणानं ती सतत चर्चेत असते. कधी ग्लॅमरस फोटो, कधी नवऱ्यासोबतचे रोमॅन्टिक व्हिडीओ ती शेअर करत असते. सध्या अंकिता गरोदर असल्याच्या अफवा पसरल्या आहेत, मात्र अभिनेत्री किंवा तिचा पती विकीने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
अंकिता लोखंडे गरोदर?
अंकिताने बिझनेसमन विकी जैनसोबत लग्न केले आहे. हे कपल नेहमीच कोणत्या ना कोणत्या इव्हेंटमध्ये एकत्र दिसतं आणि चर्चेत राहतं. अनेक वर्षे विकीला डेट केल्यानंतर, अभिनेत्रीने डिसेंबर 2021 मध्ये मोठ्या धूमधडाक्यात लग्न केले. चाहते अनेक दिवसांपासून अंकिताच्या गुड न्यूज देण्याची वाट पाहत होते आणि अभिनेत्रीने चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केल्याचे दिसत आहे.
त्याचे झाले असे की अंकिताने नुकतेच गोल्डन साडीमध्ये फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये अभिनेत्री पर्सच्या साहाय्याने तिचा बेबी बंम्प लपवताना दिसत आहे. त्यामुळे अंकिता प्रेग्नंट असल्याचं लोकांचं म्हणणे आहे. मात्र, अभिनेत्री किंवा तिचा पती विकी जैन या दोघांनीही गरोदरपणाच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. जर अंकिता खरोखरच प्रेग्नंट असेल तर तिच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
अंकिताचा पती विकी हा मोठा बिझनेस मॅन आहे. अगदी प्रत्येक सेक्टरमध्ये त्याचा बिझनेस आहे. विकी हा मुळचा छत्तीसगडचा आहे. अर्थशास्त्र विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर विकीने एमबीए केलं आणि यानंतर वडिलोपार्जित व्यवसायात त्याने स्वत:ला झोकून दिलं. विकी एका कोळसा व्यापा-याचा मुलगा आहे. त्याचे आई-वडील विनोद कुमार जैन आणि रंजना जैन दोघेही व्यवसाय करतात.