Bigg Boss 17: 'आम्ही बेबी प्लॅनिंग करणार होतो...' अंकिता लोखंडेचा नॅशनल टेलिव्हिजनवरच खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 09:13 IST2023-10-19T09:12:42+5:302023-10-19T09:13:23+5:30

अंकिता लोखंडे म्हणाली, 'विकीमुळेच बिग बॉसमध्ये आले..'

Ankita Lokhande reveals she was about to plan for baby but husband vicky wanted to enter bigg boss | Bigg Boss 17: 'आम्ही बेबी प्लॅनिंग करणार होतो...' अंकिता लोखंडेचा नॅशनल टेलिव्हिजनवरच खुलासा

Bigg Boss 17: 'आम्ही बेबी प्लॅनिंग करणार होतो...' अंकिता लोखंडेचा नॅशनल टेलिव्हिजनवरच खुलासा

बिग बॉस १७ (Bigg Boss 17) चं पर्व सुरु झालं आहे. कपल्स आणि सिंगल अशा एकूण १० स्पर्धकांनी घरात प्रवेश केला आहे. यंदाच्या पर्वाचं मुखअय आकर्षण म्हणजे घर तीन भागात विभागलं गेलं आहे. दिल, दिमाग आणि दम असे भाग करण्यात आलेत. या तीन भागात स्पर्धक राहत आहेत. तर अंकिता-विकी, नील-ऐश्वर्या या कपल्सने एंट्री घेतली आहे. अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) टीव्ही इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. त्यामुळे तिच्याकडे सर्वांचंच विशेष लक्ष आहे.

नुकतंच बिग बॉस 17 च्या लाईव्ह व्हिडिओत अंकिताने वैयक्तिक आयुष्यासंदर्भात एक खुलासा केला. अंकिता घरातील सदस्यांसोबत गार्डन एरियात बसलेली असते. तेव्हा ती म्हणते, 'मी आणि विकी बेबी प्लॅनिंग करत आहोत. केवळ विकीमुळे मी बिग बॉसमध्ये येण्यासाठी होकार दिला. विकी हा शो बघायचा आणि त्यालाच शोमध्ये येण्याची खूप इच्छा होती.'

पुढे अंकिता म्हणते ,'मी जर शोमध्ये आले नसते तर बाळाचा विचार केला असता. आता पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच बाळाचा विचार करु. हे वर्ष या शोसाठी दिलं आहे पुढील वर्षी बेबी प्लॅनिंग करण्याची आमची इच्छा आहे.'

अंकिता लोखंडे 'पवित्र रिश्ता' मालिकेमुळे घराघरात पोहोचली. नंतर सुशांतसिंह राजपूत प्रकरणामुळेही ती चर्चेत आली होती. दरम्यान तिने बिझनेसमन विकी जैन सोबत लग्नगाठ बांधली. अंकिता संसारात रमली असतानाच तिने आता पतीसोबत बिग बॉसमध्ये एन्ट्री घेतली आहे.

Web Title: Ankita Lokhande reveals she was about to plan for baby but husband vicky wanted to enter bigg boss