अंकिता लोखंडेचा पती विकीच्या हाताला ४५ टाके, अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 08:43 IST2025-09-15T08:43:31+5:302025-09-15T08:43:55+5:30
अंकिता लोखंडेचा पती विकी जैनसोबत काय घडलं? नक्की झालं काय?

अंकिता लोखंडेचा पती विकीच्या हाताला ४५ टाके, अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट
अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांची नेहमीच चर्चा होत असते. आता नुकतेच विकी जैनला एका अपघातामध्ये गंभीर दुखापत झाली आहे. ज्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विकीच्या हाताला तब्बल ४५ टाके पडले आहेत. या घटनेनंतर अंकिताने विकीसाठी एक लांबलचक आणि भावनिक पोस्ट लिहिली आहे, जी सध्या चर्चेत आहे.
निर्माता संदीप सिंह यांनी विकीच्या अपघाताची माहिती दिली होती. त्यांनी विकीचे रुग्णालयातील फोटो शेअर करत सांगितले की, विकीच्या हातात काचेचे अनेक तुकडे घुसले होते, ज्यामुळे त्याला ४५ टाके पडले आणि तीन दिवस रुग्णालयात राहावे लागले. संदीपने विकीच्या धैर्याचे आणि अंकिताच्या सुपरवुमनप्रमाणे ७२ तास त्याच्यासोबत उभे राहण्याचे कौतुक केलं होतं.
विकी आता घरी परतल्यावर अंकिताने तिच्या इंस्टाग्रामवर त्याच्यासोबतचे अनेक फोटो शेअर केले. तिने लिहिले, "माझा जोडीदार. तू नेहमीच माझा हात धरतोस, मला सुरक्षित वाटतं. तू मला नेहमी आठवण करून दिली आहे की कितीही कठीण क्षण असला तरी प्रेमच जिंकत. अगदी गंभीर परिस्थितीतही, तू मला हसवण्याचा आणि शांत करण्याचा मार्ग शोधतोस आणि हेच मला घर वाटतं".
पुढे तिनं लिहलं, "लवकर बरा हो, प्रिय विकी. प्रत्येक वादळ, प्रत्येक लढाई आपण एकत्र पार करू… सुख-दुःखात, जसं आपण एकमेकांना वचन दिलं आहे. तू माझं बळ आहेस, माझा कायमचा साथीदार आहेस, आणि तुझ्यासाठीही मी तशीच आहे. माझ्या विकीसाठी प्रेम, प्रार्थना आणि बरे होण्यासाठी ऊर्जा पाठवा", या शब्दात अंकितानं आपल्या भावना व्यक्त केल्या. अंकिताच्या या पोस्टवर चाहत्यांनी विकीच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.