अंकिता लोखंडेने केला सुशांत सिंह राजपूतच्या गाण्यावर डान्स, व्हायरल झाला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 10:33 IST2020-12-10T10:32:31+5:302020-12-10T10:33:53+5:30

अंकिता २७ डिसेंबरला होणाऱ्या झी रिश्ते अवॉर्डमध्ये सुशांत सिंह राजपूतला त्याच्याच गाण्यांवर परफॉर्म करून ट्रिब्यूट देणार आहे.

Ankita Lokhande dance on Sushant Singh Rajput song video viral | अंकिता लोखंडेने केला सुशांत सिंह राजपूतच्या गाण्यावर डान्स, व्हायरल झाला व्हिडीओ

अंकिता लोखंडेने केला सुशांत सिंह राजपूतच्या गाण्यावर डान्स, व्हायरल झाला व्हिडीओ

अंकिता लोखंडे सोशल मीडियावर फारच अॅक्टिव असते. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती सुशांत सिंह राजपूतच्या गाण्यावर डान्स रिहर्सल करताना दिसत आहे. अंकिता २७ डिसेंबरला होणाऱ्या झी रिश्ते अवॉर्डमध्ये सुशांत सिंह राजपूतला त्याच्याच गाण्यांवर परफॉर्म करून ट्रिब्यूट देणार आहे. अंकिताने या व्हिडीओत  'कौन तुझे यूं प्यार करेगा' गाण्यावर डान्स करत आहे. 

ज्या गाण्यावर अंकिता डान्स करत आहे ते सुशांत सिंह राजपूतचा सिनेमा MS Dhoni The Untold Story तील आहे. तिचा हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. अंकिता आणि सुशांतचे फॅन्स या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून प्रेम देत आहेत.

अंकिताच्या डान्स व्हिडीओवर तिचे फॅन्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडीओत अंकिता कंटेम्प्रेरी डान्स परफॉर्म करताना दिसत आहे. आपला हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले  की, 'रिहर्सल, २७ डिसेंबरला तुम्हाला भेटते'. या व्हिडीओच्या आधीही अंकिताने आपल्या डान्सचा एक व्हिडीओ शेअर केला होता. 

दरम्यान, अंकिता लोखंडे विक्की जैनला डेट करत आहे आणि नेहमीच त्याच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर अंकिता लोखंडेने पवित्रा रिश्तातून टीव्हीच्या दुनियेत पाउल ठेवले होते. या मालिकेत अंकिताने सुशांतसोबत मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर अंकिता मर्णिकर्णिका आणि बागी ३ सिनेमातही दिसली होती.
 

Web Title: Ankita Lokhande dance on Sushant Singh Rajput song video viral