एजाज खानसाठी करिअर सोडलं, आता होतोय पश्चात्ताप; अनिता हसनंदानी पहिल्यांदाच झाली व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 13:45 IST2024-09-02T13:44:34+5:302024-09-02T13:45:30+5:30

अनिता हसनंदानी मुलाच्या जन्मानंतर आता पुन्हा टेलिव्हिजनवर परतली आहे

Anita Hassanandani opens up on her relationship with Eijaz Khan she sacrificed her caree | एजाज खानसाठी करिअर सोडलं, आता होतोय पश्चात्ताप; अनिता हसनंदानी पहिल्यांदाच झाली व्यक्त

एजाज खानसाठी करिअर सोडलं, आता होतोय पश्चात्ताप; अनिता हसनंदानी पहिल्यांदाच झाली व्यक्त

अनिता हसनंदानी (Anita Hassanandani) टेलिव्हिजनवरील यशस्वी अभिनेत्री आहे. 'ये है मोहोब्बते' मध्ये तिने खलनायिका साकारली. तसंच 'काव्यांजली,'कोई अपना सा','नागिन' या मालिकांमध्येही ती झळकली. अनिताने करिअरच्या सुरुवातीला काही सिनेमांमध्येही काम केलं. 'ताल','क्रिश्ना कॉटेज' सिनेमात ती झळकली. तुम्हाला माहितीये का अनिता आणि एजाज खान (Eijaz Khan) रिलेशनशिपमध्ये होते. या नात्यामुळेच तिचं करिअरकडे दुर्लक्ष झाल्याचं ती नुकतंच म्हणाली.

अनिता हसनंदानी मुलाच्या जन्मानंतर आता पुन्हा टेलिव्हिजनवर परतली आहे. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला. ती म्हणाली, "मी एजाजकडून खूप काही शिकले. मी चांगली व्यक्ती बनले. आम्ही दोघंही आमच्या आमच्या जागी चांगले होतो पण एकमेकांसोबत आम्ही असे नव्हतो. म्हणून आम्ही वेगळे झालो. बास, पण मला एकाच गोष्टीचा आता पश्चात्ताप होतो की त्या रिलेशिनशिपसाठी मी माझं करिअर सोडलं."

ती पुढे म्हणाली, "मला माहित नाही माझं करिअर सोडणं हे एजाजला मान्य होतं की नाही. पण त्याने कधीच मला थांबवलं नाही. मला रिलेशनशिपसाठी खूप वेळ द्यायचा होता. या नादात मी करिअरमध्ये चुकीचे निर्णय घेतले. एजाजने मला कधी बळजबरी केली नाही पण तो नेहमी म्हणायचा की हा सिनेमा करु नको किंवा हा सीन करु नको. यामुळे माझ्या हातातून अनेक संधी निसटल्या. कारण तेव्हा माझ्यासाठी नातं जास्त महत्वाचं होतं. हाच एक पश्चात्ताप मला होत आहे. प्रेमात समोरच्या व्यक्तीला प्रभावित करण्यासाठी तुम्ही स्वत:मध्ये बदल करता. तुम्हाला वाटतं की त्याने तुमच्यावर प्रेम करावं म्हणून तुम्ही काही ना काही खास गोष्टी करण्यात व्यस्त असता."

अनिता आज ४३ वर्षांची असून आपल्या संसारात आनंदी आहे. २०१३ साली अनिताने रोहित रेड्डीसोबत लग्न केले. त्यांना २०२१ साली एक मुलगा झाला ज्याचं नाव आरव आहे. 'सुमन इंदोरी' मालिकेतून अनिता कमबॅक करत आहे. 

Web Title: Anita Hassanandani opens up on her relationship with Eijaz Khan she sacrificed her caree