"आणि खेळ बदलला...", प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत, नेटकरी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 13:42 IST2022-09-09T13:40:38+5:302022-09-09T13:42:30+5:30
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही.

"आणि खेळ बदलला...", प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत, नेटकरी म्हणाले...
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. मालिकांपासून कारकीर्दीची सुरुवात करणारी प्राजक्ता सध्याच्या घडीला बऱ्याच गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे. प्राजक्ताची रानबाजार वेबसीरिज चांगलीच गाजली. या सीरिजमध्ये पहिल्यांदाच अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला.सध्या प्राजक्ता सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी प्राजक्ता एक आहे. सतत ती चाहत्यांसाठी काही ना काही शेअर करत असते. अलीकडेच प्राजक्ताने स्वत: चे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. ती कोण होती हे तिला आठवले आणि खेळ बदलला अस कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. सुंदरता फक्त प्राजक्ता, एकदम कडक, एक ही दिल है कितनी बार जीतोगे, विशेषणे 'सारी देऊन संपली आता, तुझ्या चाहुलीने सुगंध दरवळला... पडता नजर तुझ्यावर येथे क्षणभर, अन् माझ्या मनातील 'प्राजक्त' बहरला....अशा कमेंट्स यूजर्सनी प्राजक्ताच्या फोटोवर केल्या आहेत.
दरम्यान प्राजक्ताला डान्स विषयातच करिअर करायचं होतं पण ती अगदी अपघाताने अभिनय क्षेत्रात आली. त्यामुळे सुरूवातीची अनेक वर्ष तिने अभिनय फार काही गंभीरपणे घेतला नव्हता, असं तिने या मुलाखतीत सांगितलं.मुलाखतीत ती म्हणाली, मी मूळची पुण्याची. ललित कला केंद्रात मी नृत्य विषयात एमए करत होते. त्यावेळी योगायोगाने डान्स ग्रुपमधील एका मुलाने मला पाहिलं आणि ‘तांदळा’ सिनेमात मला अगदी छोटीशी भूमिका मिळाली. पुढे तिने सांगितलं, ‘त्या सिनेमाच्या सेटवर असलेल्या एका असिस्टंट डायरेक्टरने मला ‘गुड मॉर्निंग महाराष्ट्र’ या कार्यक्रमाच्या ऑडिशनला पाठवलं. खास म्हणजे माझी निवड सुद्धा झाली.शिक्षण पूर्ण केल्यावर मी मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. पण तोपर्यंतही अभिनय मी फार सीरिअसली घेतला नव्हता. पण ‘जुळून येति रेशीमगाठी’ या मालिकेनंतर मला या क्षेत्राचं गांभीर्य जाणवलं, असं ती म्हणाली.