'लग्न आहे आमचं छान झालयं डेकोरेशन...'; प्रसादने अमृतासाठी घेतला खास उखाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 19:38 IST2023-11-19T19:38:02+5:302023-11-19T19:38:51+5:30

अमृता आणि प्रसादच्या उखाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

Amruta Deshmukh And Prasad Jawade Wedding Ukhana For Each Other | 'लग्न आहे आमचं छान झालयं डेकोरेशन...'; प्रसादने अमृतासाठी घेतला खास उखाणा

'लग्न आहे आमचं छान झालयं डेकोरेशन...'; प्रसादने अमृतासाठी घेतला खास उखाणा

अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख यांची जोडी बिग बॉसनं बांधली. कुटुंबिय आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत नुकतेच दोघे लग्नबंधनात अडकले. दोघांच्या शाही लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच अमृता आणि प्रसादच्या उखाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

प्रसादसाठी उखाणा घेताना अमृता म्हणाली, 'आठवत नाहीये उखाणा मला करावं लागणार आहे बहुतेक गुगल, प्रसादचं नाव घेते आठवतोय का तुम्हाला हिरो हंसराजच जुगलं'. तर प्रसादनेही अमृतासाठी खास उखाणा घेतला. प्रसाद म्हणाला, 'लग्न आहे आमचं छान झालयं डेकोरेशन, अमृताचं नाव घेतो आता लाईफमध्ये नो टेन्शन'. 

प्रसाद आणि अमृताने लग्नासाठी खास पांरपरिक लूक केला होता. गुलाबी रंगाच्या साडीत अमृताचं सौंदर्य खुलून आलं होतं. तर धोतर, सदरा आणि टोपी असा मराठमोळा लूक प्रसादने केला होता. अमृता-प्रसादच्या लग्नाला कलाविश्वातील कलाकारांनी हजेरी लावली होती. तर चाहत्यांनी प्रसाद आणि अमृताला शुभेच्छा दिल्या आहेत.

 'बिग बॉस मराठी'च्या घरात प्रसाद आणि अमृताची पहिली भेट झाली होती. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात ते दोघेही सहभागी झाले होते. 'बिग बॉस'च्या घरातच त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले होते. घरातून बाहेर पडताच त्यांनी प्रेमाची कबुली देत गुपचूप साखरपुडाही उरकला होता. आता लग्नबंधनात अडकून त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 

Web Title: Amruta Deshmukh And Prasad Jawade Wedding Ukhana For Each Other