Bigg Boss 19 मधून अमाल मलिक बाहेर? 'या' कारणामुळे शो सोडणार असल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 09:59 IST2025-10-27T09:58:59+5:302025-10-27T09:59:56+5:30
Bigg Boss 19 च्या घरातून बाहेर पडणार अमाल मलिक ?

Bigg Boss 19 मधून अमाल मलिक बाहेर? 'या' कारणामुळे शो सोडणार असल्याची चर्चा
'बिग बॉस १९' Bigg Boss 19) च्या घरातील विजेतेपदाचा दावेदार म्हणून पाहिला जात असलेल्या गायक-संगीतकार अमाल मलिक (Amaal Mallik) बद्दल एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. सोशल मीडियावर अशी जोरदार चर्चा सुरू आहे की, अमाल मलिक हा लवकरच शोमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
अमल मलिक अचानक शो सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. BBTak या 'बिग बॉस' विषयी अचूक माहिती देणाऱ्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून याबाबत एक महत्त्वाचा अपडेट शेअर करण्यात आलं आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, "तब्येतीच्या कारणास्तव अमल मलिक काही दिवस किंवा एका आठवड्यासाठी BB19 मधून बाहेर पडू शकतो अशी चर्चा आहे". याचा अर्थ असा की, अमल कदाचित कायमस्वरूपी बाहेर न पडता, वैद्यकीय उपचारांसाठी काही दिवसांची विश्रांती घेईल आणि नंतर पुन्हा शोमध्ये एंट्री करेल.
या चर्चांना अमालच्या एका वैयक्तिक कारणामुळे हवा मिळाली आहे. त्याचे वडील आणि प्रसिद्ध संगीतकार डब्बू मलिक (Daboo Malik) यांचं एक ट्विट व्हायरल झालं आहे. डब्बू मलिक यांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली, ज्यात त्यांनी लिहिले, "खूप झालं... आता बस... २८ ऑक्टोबरला भेटू... संगीत हेच आपले खरे डेस्टिनी (गंतव्यस्थान) आहे". या ट्विटमध्ये डब्बू मलिक यांनी थेट 'बिग बॉस'चे नाव घेत नसले तरी, त्यांचे ट्वीट अमालसंदर्भात असल्याचा अंदाज चाहेत बांधत आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
Bahut Hogaya .. Ab Bass … Milten Hain 28th Oct …. Music is our real destiny
— Daboo Malik (@daboomalik) October 24, 2025
'बिग बॉस १९' च्या चाहत्यांसाठी हा एक मोठा धक्का आहे, कारण अमाल मलिक सुरुवातीपासूनच आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि दमदार खेळाने प्रेक्षकांना प्रभावित करत होता. आता अमल खरोखरच शोमधून ब्रेक घेतो की नाही, हे पुढील भागात स्पष्ट होईल.