तिसऱ्यांदा बोहल्यावर चढला टीव्ही अभिनेता, लग्नातील पहिला फोटो आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 10:54 IST2023-11-04T10:53:04+5:302023-11-04T10:54:54+5:30
नॅशनल टीव्हीवर त्याने पहिलं लग्न केले होतं ज्याची खूप झाली होती, पण ते फारकाळ टिकलं नाही.

तिसऱ्यांदा बोहल्यावर चढला टीव्ही अभिनेता, लग्नातील पहिला फोटो आला समोर
'लॉक अप' आणि 'बिग बॉस' सारख्या रिअॅलिटी शोचा भाग असलेल्या अली मर्चंटने 2 नोव्हेंबरला तिसरं लग्न केले. होय...अली मर्चंटच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा गेल्या होती आणि आता त्याच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत अलीने त्याची गर्लफ्रेंड अंदलीब जैदीशी लग्न केले आहे.
38 वर्षीय अली मर्चंटने 2 नोव्हेंबर 2023 रोजी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये अंदलिब जैदीशी लग्न केले. त्यांचा लग्नाचे क फोटो समोर आले आहेत. सलमान खानचा शो 'बिग बॉस'च्या चौथ्या सीझनमध्ये अलीने टीव्ही अभिनेत्री सारा खासनसोबत नॅशनल टेलिव्हिजनवर लग्न केलं होतं. बिग बॉसच्या घरात त्यांनी लग्न केलं होतं. या लग्नाची खूप चर्चादेखील झाली होती, मात्र त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. दोघांनी 2011 मध्ये एकमेकांना घटस्फोट दिला. यानंतर अलीने 2016 मध्ये अनमशी लग्न केले. त्याचे हे नातेही टिकले नाही.
अली मर्चंटने मॉडेल असलेल्या अंदलीब जैदीशी लग्न केले आहे. अली मर्चंट गेल्या वर्षभरापासून अंदलीब जैदला डेट करतो आहे.एका फॅशन शोदरम्यान दोघांची भेट झाली होती. लग्नाला फक्त त्याचे कुटुंब आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. अली 15 नोव्हेंबरला मुंबईत आपल्या लग्नाचे रिसेप्शन देणार आहे.