Video: गणरायाच्या स्वागताची अक्षयाकडून तयारी; चुलीवर केला मोदकांचा नैवेद्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 13:50 IST2023-09-18T13:49:34+5:302023-09-18T13:50:34+5:30
Akshaya deodhar: अक्षयाने इन्स्टाग्रामवर मोदक करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Video: गणरायाच्या स्वागताची अक्षयाकडून तयारी; चुलीवर केला मोदकांचा नैवेद्य
गणरायाच्या आगमनासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सध्या सगळीकडे बाप्पाच्या स्वागतासाठी मोठ्या जल्लोषात तयारी सुरु आहे. अनेक ठिकाणी डेकोरेशन, दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. तर, घरातील गृहिणी नैवेद्याच्या तयारीला लागल्या आहेत. विशेष म्हणजे या सगळ्यात कलाकार मंडळी सुद्धा मागे नाहीत. अनेक कलाकारांनी त्यांच्या घरची बाप्पाची तयारी कशी सुरु आहे हे फोटो, व्हिडीओच्या माध्यमातून दाखवलं आहे. यामध्येच अभिनेत्री अक्षया देवधर हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
अक्षया सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम नवनवीन फोटोशूट किंवा व्हिडीओशूट करुन चर्चेत येत असते. यावेळीदेखील तिने बाप्पाच्या आगमनसाठी खास व्हिडीओशूट केलं आहे. नुकताच अक्षयाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक तयार करत आहे. विशेष म्हणजे ती चक्क चुलीवर हे मोदक तयार करत आहे. त्यामुळे सध्या नेटकऱ्यांमध्ये तिच्या या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
अक्षयाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने छान सुती कॉटनची साडी नेसली असून ती चुलीवर मोदक करत आहे. विशेष म्हणजे यावेळी अक्षयाच्या साध्या लूकनेही तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.