"असा मुलगा अजिबात नको...", सुंदराला करायचंय लग्न, पण...; काय म्हणाली अक्षया नाईक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 18:09 IST2026-02-27T18:07:57+5:302026-02-27T18:09:14+5:30
अक्षया नाईकचं लग्नावर भाष्य, कधी लग्न करणार अभिनेत्री?

"असा मुलगा अजिबात नको...", सुंदराला करायचंय लग्न, पण...; काय म्हणाली अक्षया नाईक?
'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अक्षया नाईक सध्या चर्चेत आहे. इमरान हाशमीसोबत 'तस्करी' या वेबसीरिजमध्ये काम करण्याची तिला संधी मिळाली. इतकंच नाही तर 'ग्रेटर कलेश' या हिंदी सिनेमातही ती दिसली. यामुळे अक्षया आता हिंदी इंडस्ट्रीतही परिचयाची झाली आहे. अक्षया दिसायला खूप क्युट आहे मात्र तिला अनेकदा वजनामुळे बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला. नुकतंच अक्षयाने लग्नाबद्दल आणि तिला कसा मुलगा हवा यावर भाष्य केलं आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत अक्षया नाईक म्हणाली, "माझी लग्न करायची इच्छा खूप आहे पण अजून मुलगाच नाहीये. कसा मुलगा हवा हेही मी काही फार असं ठरवलेलं नाही. म्हणजे इंडस्ट्रीतला मुलगा नसेल तरी चालेल. पण माझी मुख्य अपेक्षा हीच आहे की कलाकार जरी नसला तरी कलेवरती प्रेम करणारा असावा. प्रेक्षक असावा ही माझी माफक अपेक्षा आहे. जर तो म्हणाला की नाटक आवडतच नाही, सिनेमा बघतच नाही असं म्हणणारा नको. कलेविषयी संवेदना असणारा मुलगा हवा."
ती पुढे म्हणाली, "मुलगा मुंबईचाच हवा. कारण मला मुंबई सोडून जायचं नाही. शेवटी माझं काम इथे आहे. मुंबई किंवा मग मी एकवेळ गोव्याला जाऊन स्थायिक होईन. काहीच नाही झालं तर माझं शेवटचं ध्येय हे आहे की मला इटालियन मुलगा हवा. अधेमध्ये काहीच नाही. जर मी मुंबईत नसेन तर मी एखाद्या इटालियन मुलाशी लग्न करुन इटलीला राहीन. मला इटालियन मुलं आवडतात. ते खूप हँडसम दिसतात. त्यामुळे मला तिकडचा मुलगा चालेल. मी घरी हे मस्करीतही बोलले आहे."