"तो खास दिवस आज पुन्हा आला...", पाटलीण बाईंसाठी राणादाची खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 12:40 IST2025-05-03T12:39:48+5:302025-05-03T12:40:15+5:30
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून हार्दिक-अक्षया घराघरात पोहोचले. या मालिकेत त्यांनी राणादा आणि पाटलीण बाई या भूमिका साकारल्या होत्या. त्यांची ऑनस्क्रीन जोडी फारच हिट ठरली होती. या ऑनस्क्रीन जोडीने खऱ्या आयुष्यातही लग्नगाठ बांधल्यानंतर चाहते भलतेच खूश झाले होते.

"तो खास दिवस आज पुन्हा आला...", पाटलीण बाईंसाठी राणादाची खास पोस्ट
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कपल आहेत. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून हार्दिक-अक्षया घराघरात पोहोचले. या मालिकेत त्यांनी राणादा आणि पाटलीण बाई या भूमिका साकारल्या होत्या. त्यांची ऑनस्क्रीन जोडी फारच हिट ठरली होती. या ऑनस्क्रीन जोडीने खऱ्या आयुष्यातही लग्नगाठ बांधल्यानंतर चाहते भलतेच खूश झाले होते.
२०२२ मध्ये अक्षया आणि हार्दिकने गुपचूप साखरपुडा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. आज त्यांच्या साखरपुड्याला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने हार्दिकने अक्षयासाठी खास पोस्ट लिहिली आहे. हार्दिकने त्यांच्या साखरपुड्याचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टला त्याने "तो खास दिवस आज पुन्हा आला आहे, ज्यादिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले आणि आजही त्यासर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत. तू माझ्यासाठी खूपच खास आहेस. Happy engagement anniversary", असं कॅप्शन दिलं आहे.
अक्षया आणि हार्दिकने २ डिसेंबरला लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. त्यांच्या लग्नाला अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. अक्षया आणि हार्दिक सिनेसृष्टीत कार्यरत आहे. सध्या अक्षया 'लक्ष्मी निवास' या मालिकेत महत्त्वाची भूमिक साकारत आहे.