पैठणीवर बिकीनी ब्लाऊज घातल्यानं आकांक्षा पुरी ट्रोल; म्हणाली "विरोध करणारे लोक असणारच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 13:56 IST2026-04-09T13:51:57+5:302026-04-09T13:56:17+5:30

आकांक्षा पुरीनं महाराष्ट्राची शान असलेल्या 'पैठणी साडी'वर अतिशय बोल्ड असा बिकिनी ब्लाऊज घातल्यानं तिच्यावर टिकेचा भडिमार सुरू झाला.

Akanksha Puri Reacts Trollers Bikini Blouse Paithani Saree Controversy | पैठणीवर बिकीनी ब्लाऊज घातल्यानं आकांक्षा पुरी ट्रोल; म्हणाली "विरोध करणारे लोक असणारच..."

पैठणीवर बिकीनी ब्लाऊज घातल्यानं आकांक्षा पुरी ट्रोल; म्हणाली "विरोध करणारे लोक असणारच..."

बॉलिवूड, टेलिव्हिजन आणि भोजपुरी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडणारी आकांक्षा पुरी कायम चर्चेत असते. आता ती वादाच्या भोवऱ्यात भोवऱ्यात सापडली आहे. आकांक्षानं नुकतंच 'बॉम्बे टाइम्स फॅशन वीक'मध्ये पारंपरिक महाराष्ट्रीयन पैठणी साडी परिधान केली होती. पण, त्यावर तिनं बिकिनी स्टाइलचा ब्लाउज घातल्याने ती प्रचंड ट्रोल झाली. आता या ट्रोलिंगवर अभिनेत्रीनं प्रतिक्रिया दिली आहे.

आकांक्षानं महाराष्ट्राची शान असलेल्या 'पैठणी साडी'वर अतिशय बोल्ड असा बिकिनी ब्लाऊज घातल्यानं तिच्यावर टिकेचा भडिमार सुरू झाला.  अनेकांनी हा लूक संस्कृतीचा अपमान असल्याचं म्हटलं, तर काहींनी तिच्या फॅशन सेन्सवर प्रश्न उपस्थित केले. या सर्व टीकेवर उत्तर देताना टीव्ही ९शी बोलताना ती म्हणाली, "मला जेवढी टीका सहन करावी लागली, त्यापेक्षा कितीतरी जास्त कौतुकही मिळाले आहे. जर तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला विरोध करणारे लोक असणारच. मी नकारात्मकतेपेक्षा सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं पसंत करते".

तिनं पुढे स्पष्ट केलं की हा लूक पूर्णपणे तिचा स्वतःचा निर्णय नव्हता, तर डिझायनरचा व्हिजन होता. "ही साडी आणि ब्लाउज रोहित वर्मा यांची क्रिएशन आहे. त्यांच्या टॅलेंटवर मला पूर्ण विश्वास आहे. एक कलाकार म्हणून मी त्यांच्या दृष्टिकोनाचा आदर करत आत्मविश्वासाने हा लूक कॅरी केला", असंही ती म्हणाली.


Web Title: Akanksha Puri Reacts Trollers Bikini Blouse Paithani Saree Controversy