...म्हणून ऐश्वर्या शर्माला 'बिग बॉस १७'च्या घरामधून काढलं बाहेर; नील भट्टला अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 15:59 IST2023-12-24T15:52:59+5:302023-12-24T15:59:45+5:30

'गुम है किसी के प्यार में' मधून प्रसिद्ध झालेली ऐश्वर्या शर्मा घराबाहेर पडली आहे. 

Aishwarya Sharma was evicted from the 'Bigg Boss 17' house | ...म्हणून ऐश्वर्या शर्माला 'बिग बॉस १७'च्या घरामधून काढलं बाहेर; नील भट्टला अश्रू अनावर

...म्हणून ऐश्वर्या शर्माला 'बिग बॉस १७'च्या घरामधून काढलं बाहेर; नील भट्टला अश्रू अनावर

'बिग बॉस १७' पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त असला तरीदेखील हा शो तितकाच लोकप्रियही आहे. यंदाच्या पर्वात पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस' घरातील स्पर्धकांना मोठे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आता एक मोठे अपडेट समोर आले आहे. 'गुम है किसी के प्यार में' मधून प्रसिद्ध झालेली ऐश्वर्या शर्मा घराबाहेर पडली आहे. 

'बिग बॉस १७' मध्ये आल्यापासून ऐश्वर्या ही विकी जैन आणि अंकिता लोखंडेसोबतच्या भांडणामुळे चर्चेत आहे. बिग बॉसमधून मिळालेल्या अधिकाराचा वापर करून ईशा मालवीयने ऐश्वर्या शर्माला शोमधून बाहेर फेकले. नियम तोडण्याच्या आधारावर अंकिता, अनुराग डोवाल आणि ऐश्वर्या यापैकी एकाला बाहेर काढण्याचा अधिकार ईशाला होता. मतभेदांमुळे ईशाने ऐश्वर्याला घराबाहेर काढले. ईशाच्या निर्णयाचा नील भट्ट आणि रिंकू धवन यांनी विरोध केला होता.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कपल ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट हे 'बिग बॉस १७' मध्ये सहभागी झाले होते. ऐश्वर्या आणि नील यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. स्टार प्लसवरील 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेत त्यांनी एकत्र काम केलं होतं. या मालिकेच्या सेटवरच त्यांची लव्हस्टोरी फुलली. त्यांनी २०२१मध्ये त्यांनी विवाहबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली. ऐश्वर्या 'खतरों के खिलाडी' या रिएलिटी शोमध्येही सहभागी झाली होती.

Web Title: Aishwarya Sharma was evicted from the 'Bigg Boss 17' house