'गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा...' गाण्यावर थिरकले ऐश्वर्या-अविनाश नारकर, व्हिडीओ चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 15:18 IST2024-07-03T15:17:49+5:302024-07-03T15:18:40+5:30
Aishwarya Narkar-Avinash Narkar : गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा या गाण्यावर ऐश्वर्या आणि अविनाश नारकर थिरकले आहेत. हा रिल त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

'गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा...' गाण्यावर थिरकले ऐश्वर्या-अविनाश नारकर, व्हिडीओ चर्चेत
मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी म्हणजे ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर (Aishwarya Narkar-Avinash Narkar). या दोघांनी अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांद्वारे रसिकांचे मनोरंजन केले आहे. हे दोघेही सोशल मीडियावर सक्रीय आहेत आणि या माध्यमातून फोटो आणि रिल्स शेअर करत असतात. त्यांचे रिल्स बऱ्याचदा व्हायरलही होताना दिसत असतात. त्यांची या वयातील एनर्जी पाहून नेटकरी थक्कही होतात. तर कधी कधी त्यांना ट्रोलिंग्सचाही सामना करावा लागतो. दरम्यान आता त्यांनी एका गाण्यावर रिल बनवला आहे, जो सध्या चर्चेत आला आहे.
गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा या गाण्यावर ऐश्वर्या आणि अविनाश नारकर थिरकले आहेत. हा रिल त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात ऐश्वर्या नारकर यांनी निळ्या रंगाचा ड्रेस आणि अविनाश नारकर यांनी व्हाइट शर्ट आणि डेनिम परिधान केली आहे आणि गॉगल घालून हा डान्स केला आहे. त्यांच्या या डान्सला नेहमीप्रमाणे चाहत्यांची पसंती मिळत आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
नारकर कपलचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. एका युजरने लिहिले की, वाटच पहात असते मी आपल्या रिल्सची. दुसऱ्या युजरने म्हटले की, वय हा फक्त आकडा आहे. तर काहींनी परफेक्ट कपल, आवडतं कपल, खतरनाक एनर्जी अशा कमेंट्स केल्या आहेत.
ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं तर सध्या त्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत तितीक्षा तावडे आणि अजिंक्य ननावरे मुख्य भूमिकेत आहेत.