कोल्हापुरी हलगीवर तितीक्षासह थिरकल्या ऐश्वर्या नारकर, व्हिडिओ एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 16:35 IST2024-08-17T16:35:22+5:302024-08-17T16:35:52+5:30
तितीक्षा आणि ऐश्वर्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सेटवरील व्हिडिओही त्या शेअर करताना दिसतात. नुकतंच तितीक्षाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे.

कोल्हापुरी हलगीवर तितीक्षासह थिरकल्या ऐश्वर्या नारकर, व्हिडिओ एकदा पाहाच
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेत अभिनेत्री तितीक्षा तावडे मुख्य भूमिकेत आहे. तर ऐश्वर्या नारकर खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. तितीक्षा आणि ऐश्वर्या दोघींच्याही भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरल्या. मालिकेत जरी त्या एकमेकींच्या शत्रू असल्या तरी ऑफ स्क्रीन या दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत.
तितीक्षा आणि ऐश्वर्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सेटवरील व्हिडिओही त्या शेअर करताना दिसतात. नुकतंच तितीक्षाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तितीक्षा आणि ऐश्वर्या नारकर कोल्हापुरी हलगीवर डान्स करताना दिसत आहेत. कोल्हापुरी हलगीवर त्या दोघींनीही ठेका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. तितीक्षाने शेअर केलेला हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
दरम्यान, सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका रंजक वळणावर आहे. या मालिकेत नेत्राने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. यापैकी तिच्या एका मुलामध्ये विरोचकाचा अंश असल्याचं दाखविण्यात येणार आहे. तर विरोचकाच्या भूमिकेत असलेली रुपाली मालिकेत नव्या रुपात दिसणार आहे. या मालिकेत आता ऐश्वर्या नारकर बंगाली भूमिका साकारताना दिसणार आहेत.