वटपौर्णिमेचा रील करताना ऐश्वर्या नारकरांना बसला अविनाश यांचा ठोसा? व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 15:57 IST2024-06-21T15:51:29+5:302024-06-21T15:57:25+5:30
अविनाश - ऐश्वर्या नारकर यांनी वटपौर्णिमेनिमित्त केलेला स्पेशल रील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय (aishwarya narkar, avinash narkar)

वटपौर्णिमेचा रील करताना ऐश्वर्या नारकरांना बसला अविनाश यांचा ठोसा? व्हिडीओ व्हायरल
अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. अविनाश - ऐश्वर्या या जोडीला आपण अनेक मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय. ही जोडी मराठी मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीन जोडी म्हणून ओळखली जाते. अविनाश-ऐश्वर्या हे त्यांच्या रील व्हिडीओमुळेही चर्चेत असतात. अशातच अविनाश-ऐश्वर्या यांनी वटपौर्णिमानिमित्त एक खास रील व्हिडीओ केलाय. पण या रीलमध्ये ऐश्वर्या यांना अविनाश यांच्याकडून नकळत दुखापत झालेली दिसतेय.
रील व्हिडीओ शूट करताना ऐश्वर्या यांना मार बसला?
अविनाश-ऐश्वर्या हे सोशल मीडियावर विविध रील व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच आज वटपौर्णिमेनिमित्त अविनाश-ऐश्वर्या यांनी एक रील व्हिडीओ पोस्ट केलाय. यात 'आज फिर जीने की तमन्ना' गाण्यावर दोघेही धमाल रील बनवताना दिसतात. दोघंही खास स्टेप करत नाचताना दिसतात. अशातच रील करताना नकळत अविनाश यांचा ठोसा ऐश्वर्या यांच्या चेहऱ्याला बसतो. त्यामुळे ऐश्वर्या यांना थोडीशी दुखापत होऊन त्या बाजूला होतात. या व्हिडीओखाली 'खरंच लागलं का?' अशा काळजीवाहू कमेंट त्यांच्या चाहत्यांनी केल्या आहेत.
अविनाश-ऐश्वर्या यांचं वर्कफ्रंट
अविनाश नारकर - ऐश्वर्या नारकर ही रिअल लाईफ नवरा-बायकोची जोडी गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात सक्रीय आहेत. हे दोघेही सिनेमा, मालिका आणि विविध माध्यमांत कार्यरत आहेत. ऐश्वर्या सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत अभिनय करत आहेत. तर अविनाश यांना 'स्वरगंधर्व सुधीर फडके' सिनेमात आपण पाहिलं. याशिवाय सन मराठीवरील 'कन्यादान' मालिकेत त्यांनी काम केलं.