अग्गंबाई...! अभिजीत राजे आणि आसावरी पुन्हा आले एकत्र, चाहत्यांची वाढली उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 11:54 IST2022-01-22T11:53:23+5:302022-01-22T11:54:08+5:30

बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर अभिजीत राजे (Dr.Girish Oak) आणि आसावरी (Nivedita Saraf) एकत्र आले आहेत.

Aggabai ...! Abhijeet Raje and Asavari reunited, much to the chagrin of the fans | अग्गंबाई...! अभिजीत राजे आणि आसावरी पुन्हा आले एकत्र, चाहत्यांची वाढली उत्सुकता

अग्गंबाई...! अभिजीत राजे आणि आसावरी पुन्हा आले एकत्र, चाहत्यांची वाढली उत्सुकता

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका अग्गंबाई सासूबाई (Aggabai Sasubai) त्यानंतर आलेला सीक्वल अग्गंबाई सूनबाई (Aggabai Sunbai)ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. या मालिका संपून बराच कालावधी उलटला आहे. मात्र तरीदेखील आजही या मालिकेतील पात्र रसिकांच्या मनात घर करून कायम आहेत. या मालिकेतील कलाकार सातत्याने वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. दरम्यान या मालिकेतील लाडके जोडपे अभिजीत राजे आणि आसावरी चर्चेत आले आहेत. त्याला कारणही तसेच आहे. इतक्या मोठ्या कालावधीनंतर अभिजीत आणि आसावरी एकत्र आले आहेत. ते कोणत्या मालिकेत दिसणार आहेत का, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

अभिजीत राजे म्हणजेच अभिनेते डॉ. गिरीश ओक (Dr.Girish Oak) आणि आसावरी म्हणजेच निवेदिता सराफ (Nivedita Saraf) नुकतेच एका शूटिंगसाठी एकत्र आले आहेत. मात्र ते कोणत्या मालिकेच्या शूटिंगसाठी एकत्र आलेले नाहीत. तर ते दोघे एका जाहिरातीत एकत्र दिसणार आहेत. ती कोणती जाहिरात आहे, याबाबत काही समजू शकलेले नाही. 

गिरीश ओक आणि निवेदिता सराफ करताहेत जाहिरातीचं शूटिंग
याबद्दल आसावरी म्हणजेच निवेदिता सराफ म्हणाल्या की, आज खूप दिवसांनी मी माझ्या आवडत्या सहकलाकारासोबत काम करते आहे. त्यावर अभिजीत राजे म्हणजेच गिरीश ओक म्हणाले हो, मीपण माझ्या आवडत्या कलाकारासोबत काम करतो आहे. 
त्यानंतर पुढे निवेदिता सराफ म्हणाल्या की, खूप मजा येते आहे आम्हाला. आम्ही एका जाहिरातीचे शूटिंग करतो आहे. इथे खूप छान शूटिंग सुरू आहे. जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. खूप दिवसांनी आम्ही एकत्र काम करतो आहे. त्यामुळे खूप मज्जा येते आहे. पुन्हा आम्ही एकत्र काम करताना दिसू , अशी आशा करते.

Web Title: Aggabai ...! Abhijeet Raje and Asavari reunited, much to the chagrin of the fans