अवनीत कौर की निकल पडी! कोहलीमुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्रीची थेट हॉलिवूड सुपरस्टारसोबत भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 15:43 IST2025-05-13T15:42:51+5:302025-05-13T15:43:26+5:30

सुप्रसिद्ध अभिनेत्री अवनीत कौरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत ती हॉलिवूड सुपरस्टारला भेटलेली दिसत आहे

after virat kohli Avneet Kaur meet hollywood actor tom cruise mission impossible dead reckoning | अवनीत कौर की निकल पडी! कोहलीमुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्रीची थेट हॉलिवूड सुपरस्टारसोबत भेट

अवनीत कौर की निकल पडी! कोहलीमुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्रीची थेट हॉलिवूड सुपरस्टारसोबत भेट

अवनीत कौर (avneet kaur) सध्या चांगलीच चर्चेत आहे. विराट कोहलीने (virat kohli) तिच्या फॅन पेजवरील फोटोला लाईक केल्याने या अभिनेत्रीची एकच चर्चा झाली. इतकंच नव्हे तर दोन दिवसांमध्ये अवनीतच्या फॉलोअर्समध्येही चांगलीच वाढ झाली. अशातच अवनीत कौर सध्या आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. ती म्हणजे अवनीतने नुकतीच हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रुझची (tom cruise) भेट घेतली आहे. अवनीत आणि टॉमचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अवनीत आणि टॉम क्रुझची खास भेट

अवनीतने सोशल मीडियावर टॉमसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये अवनीतने टॉमला भारतीय स्टाईलमध्ये नमस्ते करायला लावलं आहे. टॉमने सुद्धा अवनीतला साथ दिली आहे. या दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. "माझ्याकडून आणि मिस्टर क्रूझकडून संपूर्ण भारताला नमस्कार... टॉम क्रूझ... मिशन इम्पॉसिबल.. तुम्हाला पुन्हा भेटून आनंद झाला." असं कॅप्शन देत अवनीतने हा फोटो शेअर केला आहे. अवनीत आणि टॉम दोघांनीही काळ्या रंगाचे एकमेकांना मॅचिंग कपडे परिधान करत खास पोज  दिली आहे.


अवनीत याआधीही टॉमला भेटलीय

अवनीतने याआधीही टॉम क्रुझची भेट घेतली आहे. लंडनमध्ये अवनीतने टॉमचा अभिनयाचा मास्टरक्लास अटेंड केला होता. तेव्हापासून तिची आणि टॉमची ओळख आहे. दरम्यान मिशन इम्पॉसिबल सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर,  The Final Reckoning सिनेमामध्ये इथन हंटला आजवरच्या सर्वात धोकादायक, अत्यंत वैयक्तिक आणि कथानकाच्या दृष्टीने सर्वात गुंतागुंतीच्या मिशनला सामोरं जावं लागतं. एक असं मिशन जे केवळ जागतिक सुरक्षेला नाही, तर त्याच्या स्वतःच्या अस्तित्वालाही मुळांपर्यंत हादरवून टाकेल.  Mission: Impossible – The Final Reckoning भारतभर १७ मे २०२५ रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये  प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: after virat kohli Avneet Kaur meet hollywood actor tom cruise mission impossible dead reckoning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.