वैभव मांगलेनंतर मालिकेत आता हा प्रसिद्ध अभिनेता साकारणार स्त्री भूमिका, पहिली झलक आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 14:53 IST2022-12-12T14:46:06+5:302022-12-12T14:53:33+5:30
मराठीतील दिग्गज अभिनेते वैभव मांगले यांनी छोट्या पडद्यावर स्त्री भूमिका साकारल्या आहेत. त्यानंतर आता आणखी एक प्रसिद्ध अभिनेता अशीच भूमिका साकारताना दिसणार आहे.

वैभव मांगलेनंतर मालिकेत आता हा प्रसिद्ध अभिनेता साकारणार स्त्री भूमिका, पहिली झलक आली समोर
टाईमपास, पावनखिंड, शेर शिवराज, काकस्पर्श अशा अनेक चित्रपटांत झळकलेले, छोट्या पडद्यावरच्या अनेक लोकप्रिय मालिकेत दिसलेले आणि नाटकांतून गाजलेले मराठीतील दिग्गज अभिनेते वैभव मांगले (Vaibhav Mangale ) यांनी छोट्या पडद्यावर स्त्री भूमिका साकारल्या आहेत. त्यानंतर आता आणखी एक प्रसिद्ध अभिनेता अशीच भूमिका साकारताना दिसणार आहे.
सोनी मराठी 'प्रतिशोध' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते आहेत. या मालिकेच्या प्रोमोमध्ये आपल्याला अमोल बावडेकर स्त्रिची भूमिका साकारताना दिसणार आहे.
ममता असे या व्यक्तिरेखेचे नाव आहे. अमोल बावडेकर सोबतच पायल मेमाणे हि सुद्धा पाहायला मिळत आहे. ममताच्या मुलीची म्हणजेच दिशा ची व्यतिरेखा यात ती साकारताना दिसणार आहे. पण मालिकेत भूतकाळातील काही विशिष्ट गोष्टींमुळे ममता आणि दिशा यांच्या भविष्यात काय अडचणींना सामोरे जावे लागत आहे हे आपल्याला या मालिकेतून पाहायला मिळेल.
अमोल बावडेकरने आजपर्यंत सिनेमा, रंगभूमी आणि मालिका सगळ्याच माध्यमात अनेक विविधांगी भूमिका केल्या आहेत. अलीकडेच 'पांघरूण' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आता अमोलला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहते नक्कीच उत्सुक असतील.