'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील सचिन त्यागीनंतर आणखीन दोन कलाकारांना झाली कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 18:36 IST2020-08-25T18:35:44+5:302020-08-25T18:36:15+5:30
‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या आणखी दोन कलाकारांची कोरोना चाचणी आली पॉझिटिव्ह

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील सचिन त्यागीनंतर आणखीन दोन कलाकारांना झाली कोरोनाची लागण
कोरोना व्हायरसमुळे जवळपास तीन महिने मालिका व चित्रपटांचे शूटिंग थांबले होते. मात्र आता काही नियम आणि अटींसोबत शूटिंगला परवानगी देण्यात आली आहे. भलेही शूटिंगला सुरूवात झाली असली तरीदेखील कोरोनाचे सावट अद्याप आहेच. त्यात आता शूटिंग दरम्यान अनेकांना कोरोनाची लागण होत असल्यामुळे शूटिंग थांबवावे लागत आहे. दरम्यान आता ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेच्या शूटिंगलादेखील ब्रेक लागला आहे. या मालिकेतील अभिनेते सचिन त्यागी यांच्यासोबत क्रू मेंबर्सही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. त्यांनतर आणखी दोन कलाकार म्हणजेच समीर ओनकर आणि स्वाती चिटनिस यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
सचिन त्यागी, समीर ओनकर आणि स्वाती चिटनिस यांना सध्या होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच मोहसिन खान (कार्तिक) , शिवांगी जोशी आणि मालिकेतील इतर कलाकारांनी स्वत:ला सेल्फ क्वारंटाइन करुन घेतले आहे. तसेच प्रोडक्शन हाउसने सेटवर उपस्थित असलेल्या सर्वांची कोरोना टेस्ट करुन घेतली आहे. पण त्यांचे कोरोना रिपोर्ट अद्याप आले नसल्याचे समजते आहे.
यापूर्वी कसौटी जिंदगी की आणि भाकरवडी मालिकेचे शूटिंगही कोरोनामुळे थांबले होते. कसौटी जिंदगी कीमधील मुख्य अभिनेता पार्थ समथानला मालिकेचे शूटिंग सुरू झाल्यानंतर काही दिवसातच कोरोना झाला होता. तर भाकरवडी मालिकेचा क्रू मेंबरचा गेल्या महिन्यात कोरोनामुळे मृत्यू झाला होता.