"अनेक दिवस ना फोन, ना मेसेज.."; अद्वैत दादरकर रसिका सुनिलला काय म्हणाला? पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 09:00 IST2025-08-03T08:59:02+5:302025-08-03T09:00:10+5:30
अद्वैत दादरकरने अभिनेत्री रसिका सुनिलसाठी लिहिलेली पोस्ट व्हायरल झाली आहे. काय म्हणाला अद्वैत

"अनेक दिवस ना फोन, ना मेसेज.."; अद्वैत दादरकर रसिका सुनिलला काय म्हणाला? पोस्ट चर्चेत
आज फ्रेंडशिप डे. मैत्रीचा दिवस. अनेक लोक त्यांच्या मित्र-मैत्रिणींसोबत हा खास दिवस आनंदात साजरा करत आहे. मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारही एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रीण आहेत. अशातच 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत एकत्र झळकलेले अद्वैत दादरकर आणि रसिका सुनिल हे कलाकारही रिअल लाईफमध्ये एकमेकांचे चांगले मित्र आहेत. अशातच आज फ्रेंडशिप डे निमित्त रसिकाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त अभिनेता अद्वैत दादरकरने तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.
अद्वैतची रसिकासाठी खास पोस्ट
अद्वैत दादरकरने सोशल मीडियावर रसिकासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करुन अद्वैत लिहितो, "Raski. आपण अनेक दिवस भेटत सुद्धा नाही.
अनेक दिवस ना फोन, ना मेसेज पण तरीही कुठल्याही परिस्थित एक व्यक्ती आहे. मी काहीही वागलो, कसाही वागलो तरीही judge न करता माझ्या पाठीशी ठाम उभी असलेली व्यक्ती आहे. ती म्हणजे तू Raski. friendship day आणि तुझा वाढदिवस एकत्र यावा? तुझ्या सारखी मैत्रीण कोणालाही नाही मलाच मिळो.. खूप प्रेम Raski
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा."
अशाप्रकारे अद्वैतने रसिकासाठी खास पोस्ट लिहिली आहे. अद्वैतच्या या पोस्टखाली रसिका कमेंट करुन लिहिते, 'अरे यार! रडव तू. मी नेहमी तुझीीच आहे. लव्ह यू ऑलवेज' अशाप्रकारे अद्वैत-रसिकाने एकमेकांना मैत्रीदिनाच्या खास शुुभेच्छा दिल्या आहेत. अद्वैत-रसिका दोघांनीही 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत एकत्र अनेक वर्ष काम केलं. या मालिकेपासूनच त्यांची मैत्री वाढली. या दोघांनीही ही मैत्री ऑफ स्क्रीनही तशीच जपली.