कौतुकास्पद! 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम रसिका सुनील अशी साजरी केली नवरात्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 16:44 IST2022-09-26T16:43:43+5:302022-09-26T16:44:13+5:30
Rasika Sunil : रसिकाने दादर येथील कमला मेहता अंध मुलींच्या शाळेतील मुलींसोबत काही क्षण घालवले. मुलींसोबत दांडिया रंगवण्याबरोबरच तिने तब्बल २५० अंध मुलींच्या रिंगणात गरब्यावर ताल धरला.

कौतुकास्पद! 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम रसिका सुनील अशी साजरी केली नवरात्री
माझ्या नवऱ्याची बायको फेम शनाया उर्फ रसिका सुनील (Rasika Sunil) हिने एका वेगळ्या ढंगात नवरात्र साजरी केली आहे. रसिकाने दादर येथील कमला मेहता अंध मुलींच्या शाळेतील मुलींसोबत काही क्षण घालवले. मुलींसोबत दांडिया रंगवण्याबरोबरच तिने तब्बल २५० अंध मुलींच्या रिंगणात गरब्यावर ताल धरला. तसेच शाळेतील शिक्षकवर्ग, मुलींनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तूचे निरीक्षण केले.
रसिका सुनीलने या निमित्ताने एक पोस्ट आपल्या सोशल मीडियावर शेअर करत माहिती दिली आणि लिहिले की, लहानपणापासूनच नवरात्री साजरी करतेय, पण यंदाची नवरात्रोत्सव माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. मी इतक्या सुंदर आणि बुद्धिवान मुलींच्या सानिध्यात काही क्षण घालवले. माझ्यासाठी त्या नवदुर्गा असून एक डोळस नवरात्र मी या निमित्ताने साजरी केली आहे. रसिका लवकरच एका छान प्रोजेक्ट्स द्वारे प्रेक्षकांसमोर येणार आहे. शनाया या तिच्या अल्लड आणि स्वार्थी व्यक्तिरेखाच्या पलीकडे पाहिले, तर वास्तव्यात ती खूप भावनिक आणि उदार आहे, हे या निमित्ताने कळले.
'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत विशेषतः राधिका आणि शनायाची जुगलबंदी रसिकांना भावली होती.निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिका सुनील हिने शनाया साकारली होती.
रसिका सुनीलने 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेव्यतिरिक्त गर्लफ्रेंड, बसस्टॉप आणि बघतोस काय मुजरा कर या सिनेमातही काम केले आहे.