"...तर सर्व गोष्टींचा त्याग करुन मी साध्वी होईल"; घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 13:47 IST2025-05-19T13:45:13+5:302025-05-19T13:47:28+5:30
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान साध्वी होईल, असं वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. काय म्हणाली अभिनेत्री?

"...तर सर्व गोष्टींचा त्याग करुन मी साध्वी होईल"; घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने अभिनेत्री युविका चौधरी (yuvika chaudhary) ही लोकांची आवडती अभिनेत्री. युविकाला आपण 'बिग बॉस ९' आणि 'नच बलिए ९' सारख्या कार्यक्रमांमध्ये भाग घेताना पाहिलंय. युविकाने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की, "भविष्यात सर्व काही सोडून मी साध्वी बनण्याचा विचार करत आहेत." युविकाच्या या वक्तव्याने सर्वांना आश्चर्य वाटलं आहे. युविका सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर राहून Vlogging करताना दिसते. काय म्हणाली युविका? जाणून घ्या.
युविकाचा साध्वी बनण्याचा विचार
पारस छाबडासोबत एका पॉडकास्टमध्ये युविकाशी बोलताना पारसने तिच्या कुंडलीचा उल्लेख केला. "तू लवकरच संत होशील, असं तुझ्या कुंडलीत लिहिलं आहे." त्यावर प्रतिक्रिया देताना युविकाने सांगितले की, "इतक्यात नाही पण आयुष्यात एक वेळ येईल जेव्हा मी धार्मिक सेवेत स्वतःला पूर्ण झोकून देईल. सध्या मी फक्त स्वतःसाठी धार्मिक आहे. पण भविष्यात मी सर्व काही सोडून अध्यात्माच्या सेवाभावनेत स्वतःला पूर्णपणे झोकून देईन, अशी शक्यता आहे."
युविका चौधरीने मुलीच्या जन्मानंतर आयुष्यात खूप मोठे बदल अनुभवले आहेत. तिने सांगितले की, "सांसारिक जीवन जगणेही आवश्यक आहे. त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं आणि आपल्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होतो. आई झाल्यानंतर मी खूप बदलली आहे. मला नात्यांचं महत्व आणखी कळालं आहे." युविकाने भविष्यात साध्वी होईल, असं सांगितल्याने तिच्या चाहत्यांना चांगलंच आश्चर्य वाटलंय. युविका चौधरीचं रिअल लाईफमध्ये प्रिन्स नरुलासोबत लग्न झालं आहे. काही दिवसांपूर्वी युविका आणि प्रिन्स घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. "परंतु माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला", असं म्हणत युविकाने या अफवांना खोडून काढलं.