'बिग बॉस मराठी ५'मधील पहिली स्पर्धक, ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची दणक्यात एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 21:43 IST2024-07-28T21:20:14+5:302024-07-28T21:43:27+5:30
ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची बिग बॉस एन्ट्री झालीय

'बिग बॉस मराठी ५'मधील पहिली स्पर्धक, ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची दणक्यात एन्ट्री
'बिग बॉस मराठी ५' मध्ये पहिल्या स्पर्धकाची एन्ट्री झालीय. ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची 'बिग बॉस मराठी ५' मध्ये एन्ट्री झालीय. अप्सरा आली या गाण्यावर वर्षा उसगावकर यांची शानदार एन्ट्री झालीय. रितेशने अत्यंत आदराने वर्षा उसगावकर यांंचं स्वागत केलं. वर्षा यांनी ९० चा काळ गाजवलाय. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे अशा दिग्गज अभिनेत्यांसोबत वर्षा यांनी काम केलंय.
वर्षा या 'बिग बॉस मराठी ५' मधील पहिल्या स्पर्धक
'बिग बॉस मराठी ५' मध्ये वर्षा उसगावकर यांची दणक्यात एन्ट्री झालीय. वर्षा यांनी आल्या आल्या पॉवर कार्ड घेतलंय. त्यांनी ड्यूटी फ्रीचं पॉवर कार्ड घेतलंय. यंदा बिग बॉस मध्ये काहीच मोफत मिळणार नाहीए. सगळ्या गोष्टींसाठी स्पर्धकांना किंमत मोजावी लागणार आहे. बेडरुम, बाथरुम, किचन सगळीकडे पैसे भरावे लागणार आहेत. यासाठी १० हजार बिग बॉस करन्सीचा समावेश करण्यात आला आहे. यासोबत पॉवर कार्डही आहे. पॉवर कार्ड घेतलं तर कोणतीही ड्युटी करण्याची गरज नाही.