अभिनेत्री तेजश्री प्रधानचे छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार या मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 13:34 IST2021-12-15T13:33:32+5:302021-12-15T13:34:47+5:30
'अग्गंबाई सासूबाई' (Aggabai Sasubai) मालिकेनंतर आता तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करताना दिसणार आहे.

अभिनेत्री तेजश्री प्रधानचे छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार या मालिकेत
होणार सून मी ह्या घरची या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) घराघरात पोहचली. त्यानंतर ती 'अग्गंबाई सासूबाई' (Aggabai Sasubai) या मालिकेत झळकली. या मालिकेत तिने साकारलेली शुभ्रा प्रेक्षकांना खूपच भावली. त्यानंतर आता ती पुन्हा एकदा मालिकेत झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे तिचे चाहते याबद्दल जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. ती 'फुलाला सुगंध मातीचा' (Phulala Sugandh Maticha) या मालिकेत दिसणार आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मालिकेच्या सुरुवातीपासूनच येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यास यशस्वी ठरला आहे. आता ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत लवकरच अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची एंट्री होणार आहे. शिर्डीमधल्या आनंद जत्रेत अष्टपैलू व्यक्तिमत्त्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, असे मालिकेत दाखवण्यात आले आहे.
सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार तेजश्री प्रधान
या स्पर्धेत कीर्ती सहभागी होणार आहे आणि या स्पर्धेच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत तेजश्री प्रधान दिसणार आहे. ती सेलिब्रेटी होस्ट म्हणून कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. ही स्पर्धा कीर्तीसाठी अतिशय महत्त्वाची आहे. यात तिच्या बुद्धीमत्तेची आणि हजरजबाबीपणाची कसोटी लागताना दिसणार आहे.