लालबागमध्ये घर घेण्यासाठी 'या' अभिनेत्रीने केली मोलाची मदत, विवेक सांगळेने केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 16:44 IST2025-08-11T16:35:53+5:302025-08-11T16:44:59+5:30
लालबागमध्ये विवेक सांगळेने स्वतःचं हक्काचं घर घेतलं. त्यासाठी एका मराठी अभिनेत्रीने विवेकला मोलाची मदत केली आहे

लालबागमध्ये घर घेण्यासाठी 'या' अभिनेत्रीने केली मोलाची मदत, विवेक सांगळेने केला मोठा खुलासा
विवेक सांगळेने लालबागमध्ये स्वतःचं घर घेतलं. त्यामुळे सर्वांनी त्याचं अभिनंदन केलंय. 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत सध्या विवेक सांगळे काम करतोय. विवेक ज्या विभागात लहानपणापासून राहतोय तिथेच विवेकने नवीन घर घेतलंय. लालबागसारख्या मोठ्या ठिकाणी जिथे घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, तिथे विवेकने घर घेतल्याने सर्वांनी त्याचं कौतुक केलंय. यासाठी विवेकला एका अभिनेत्रीने मोलाची मदत केली आहे. कोण आहे ती अभिनेत्री?
या अभिनेत्रीला विवेकने केलीय मोलाची मदत
विवेक सांगळेने एका मुलाखतीत याविषयी खुलासा केलाय. लालबागसारख्या ठिकाणी घर घेणं हे विवेकसाठी स्वप्नवत गोष्ट होती. विवेकचं जुनं घर आहे तिथून पाच-दहा मिनिटांच्या अंतरावर विवेकचं हे नवीन घर आहे. जेव्हा कष्टाने आपला मुलगा स्वतःचं घर घेतो तेव्हा आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद येणं साहजिक आहे. विवेकला हे घर घेण्यासाठी अभिनेत्री तन्वी मुंडलेने मोलाची मदत केली. याशिवाय संतोष राणेनेही चांगली मदत केली. विवेक आणि तन्वीने एकत्र 'भाग्य दिले तू मला' मालिकेत काम केलंय. यानिमित्ताने विवेक आणि तन्वी खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे चांगले मित्र आहेत.
जिथे वडील काम करायचे तिथेच घेतलं घर
लोकमत फिल्मीशी बोलताना विवेकने घर घेतल्याबद्दल त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्याने खुलासा केला की, "खूप छान वाटतंय. अभ्युदयनगरमध्येच मी लहानाचा मोठा झालो. प्रत्येकाचं स्वप्न असतं की स्वत:चं घर असावं. त्याहून मोठी गोष्ट म्हणजे आपण ज्या परिसरात वाढलोय तिथेच एक घर असावं. तसंच हा क्षण खूप खास यासाठी आहे कारण या इमारतीच्या बाजूलाच दिग्विजय टेक्सटाईल मिल आहे जिथे माझे वडील काम करायचे. तेव्हा मी अभिनेता होईन ही कल्पनाही मी केली नव्हती. २००० साली वडिलांची मिल बंद झाली होती तेव्हा सतत वाटायचं की त्यांनी जिथे काम केलंय तिथेच त्यांच्यासाठी एक घर घ्यावं. घरातून त्यांना त्यांची मिल दिसेल असा व्ह्यू असावा. ते स्वप्न पूर्ण झालं आहे."