प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं मॅटर्निटी फोटोशूट! लवकरच होणार आई, चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 13:04 IST2025-12-02T12:58:59+5:302025-12-02T13:04:16+5:30
प्रसिद्ध अभिनेत्रीने गुड न्यूज दिली असून ती लवकरच आई होणार आहे. अभिनेत्रीचं मॅटर्निटी फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे

प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं मॅटर्निटी फोटोशूट! लवकरच होणार आई, चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'देवों के देव... महादेव' मध्ये 'पार्वती'ची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सोनारिका भदौरिया आता आयुष्यात नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यास उत्सुक आहे. सोनारिका लवकरच आई होणार असून, तिने नुकतेच पती विकास पराशरसोबतचे अत्यंत रोमँटिक मॅटर्निटी फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.
रोमँटिक फोटोशूटची चर्चा
सोनारिकाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती आणि तिचा पती विकास पराशर अत्यंत रोमँटिक दिसत आहेत. ब्लॅक टॉपमध्ये सोनारिका खूपच स्टाइलिश आणि सुंदर दिसत आहे. एका फोटोमध्ये तिचा पती विकास, तिचा 'बेबी बंप' धरून तिच्या कपाळावर किस करताना दिसतोय. सोनारिकाने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये 'डिसेंबर' असं नमूद केलं आहे. ज्यामुळे सोनारिकाची डिसेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार असल्याची शक्यता आहे.
सोनारिका भदौरियाने २०१२ मध्ये तिचा बॉयफ्रेंड आणि बिझनेसमन असलेल्या विकास पराशरसोबत लग्न केले. अनेक वर्षांच्या रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या दोघांनी कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्न केलं आहे. आता दोघांनाही आयुष्याचा नवीन अध्याय सुरु करण्याची उत्सुकता आहे.
टीव्ही इंडस्ट्रीतून घेतली होती विश्रांती
सोनारिका भदौरिया टीव्ही जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'देवों के देव... महादेव' मधील पार्वतीच्या भूमिकेमुळे तिला अमाप लोकप्रियता मिळाली. याशिवाय ती 'दास्तान-ए-मोहब्बत: सलीम-अनारकली', 'इश्क में मरजावां' आणि काही साउथ इंडियन चित्रपटांमध्येही दिसली. मात्र, लग्नानंतर तिने अभिनयातून विश्रांती घेतली. सध्या ती सोशल मीडियावर आपल्या गरोदरपणाचा हा सुंदर प्रवास चाहत्यांसोबत शेअर करत आहे. तिच्या चाहत्यांनी आणि टीव्ही कलाकारांनी तिच्या या फोटोंवर भरभरून प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.