किती गोड! तीन महिन्यांनी अभिनेत्रीने दाखवला लेकाचा चेहरा, ठेवलं 'हे' खास नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 13:38 IST2025-12-03T13:36:30+5:302025-12-03T13:38:48+5:30
टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाच्या सहा वर्षांनंतर आई झाली आहे. या अभिनेत्रीने बाळाचं खास नाव ठेवलं आहे

किती गोड! तीन महिन्यांनी अभिनेत्रीने दाखवला लेकाचा चेहरा, ठेवलं 'हे' खास नाव
मनोरंजन विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तीन महिन्यानंतर तिच्या मुलाचा चेहरा सर्वांना दाखवला आहे. अभिनेत्रीचा पतीही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री म्हणजे शीना बजाज. शीनाचा पती राज पुरोहितने लोकप्रिय टीव्ही मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये 'अरमान पोद्दार'ची साकारली आहे. या जोडप्याने सोशल मीडियावर आपल्या बाळाचा पहिला फोटो शेअर करत, त्याचे खास नावही जाहीर केले आहे.
काय ठेवलं मुलाचं नाव?
रोहित आणि शीना यांनी आपल्या मुलाचे नाव 'आरुष बजाज पुरोहित' असं ठेवलं आहे. १५ सप्टेंबर २०२५ रोजी हे दोघेही आई-बाबा झाले. बाळाच्या जन्मानंतर जवळपास तीन महिन्यांनी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बाळाची पहिली झलक सर्वांना दाखवली. याशिवाय त्याच्या नावाचाही उलगडा केला.
या जोडप्याने एक मनमोहक कोलाज फोटो शेअर केला, ज्यामध्ये गोंडस आरुषचे हात, पाय आणि त्याचा चेहरा पाहायला मिळत आहे. या फोटोतील क्युटनेस चाहत्यांना खूप आवडला असून, चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
रोहित आणि शीना यांनी ही पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, "आमचा हा छोटा चमत्कार तुमच्या आशीर्वादाने आणि प्रार्थनेने आला आहे. या छोट्या हातांना आणि पायांना मोठे होण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची आणि प्रार्थनांची गरज आहे. कृपया माझ्या बाळाला आशीर्वाद द्या"
रोहित पुरोहित आणि शीना बजाज हे टीव्ही इंडस्ट्रीतील क्यूट कपलपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांनी २२ जानेवारी २०१९ रोजी एका खाजगी समारंभात विवाह केला होता. लग्नाच्या जवळपास सहा वर्षांनंतर २०२५ मध्ये त्यांनी आपल्या पहिल्या मुलाचे स्वागत केले असून, आता ते पालकत्वाचा आनंद घेत आहेत.