'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतील या अभिनेत्रीचं आहे राहुल द्रविडसोबत खास कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 12:45 IST2022-01-12T12:44:33+5:302022-01-12T12:45:11+5:30
तुम्हाला माहित आहे का? मराठी सिनेइंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे आणि राहुल द्रविड (Rahul Dravid)चे खास नाते आहे.

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतील या अभिनेत्रीचं आहे राहुल द्रविडसोबत खास कनेक्शन
भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड (Rahul Dravid)चा नुकताच वाढदिवस पार पडला. सध्या तो टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करतो आहे. राहुल द्रविड द वॉल म्हणून प्रचलित आहे. राहुल द्रविडच्या वाढदिवसानिमित्त त्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र तुम्हाला माहित आहे का? मराठी सिनेइंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे आणि राहुल द्रविडचे खास नाते आहे.
‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundara Manamadhye Bharali) मालिकेतील एका अभिनेत्रीचा राहुल द्रविड (Rahul Dravid) हा काका आहे. या अभिनेत्रीने नुकतीच ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये ही अभिनेत्री राहुल द्रविड सोबत दिसत आहेत. ही अभिनेत्री म्हणजे अदिती द्रविड (Aditi Dravid). सध्या ती ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत काम करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये ती नंदिनीची भूमिका साकारत आहे.
आदिती द्रविडने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो तिच्या बालपणीचा असून तिच्या बाजूला राहुल द्रविड दिसत आहे. आदितीने हा फोटो शेअर करून म्हटले की, आपण एकच कुटुंब असल्याचा मला खूप अभिमान आहे. त्याचप्रमाणे द्रविड हे आडनाव मला खूप आवडते. त्यामुळे माझे नाव मी कधीही बदलणार नाही. काका तुम्हाला शुभेच्छा.
अभिनेत्री अदिती द्रविडने सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेच्याआधी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमध्ये काम केले आहे. या मालिकेत तिने इशाची भूमिका साकारली होती.