'तुमच्यातील लहान मुलाला...'; आप्पांसाठी रुपालीची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 14:17 IST2022-05-31T14:16:52+5:302022-05-31T14:17:34+5:30

Rupali bhosle: रुपालीने ही पोस्ट शेअर करण्यासोबतच काही फोटोदेखील शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोघंही हटके अंदाजात दिसत आहेत.

actress rupali bhosle write post co actor kishor mahabole birthday | 'तुमच्यातील लहान मुलाला...'; आप्पांसाठी रुपालीची खास पोस्ट

'तुमच्यातील लहान मुलाला...'; आप्पांसाठी रुपालीची खास पोस्ट

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीमध्ये यशस्वी घोडदौड करत आहे. उत्तम कथानकासह त्याला कलाकारांनी केलेला साजेसा अभिनय यामुळे ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. या मालिकेतील कलाकारांचं जसं एकमेकांसोबच उत्तम बॉण्डिंग आहे. तसंच पडद्यामागेही त्यांची मैत्री असल्याचं पाहायला मिळतं. अलिकडेच संजनाने म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali  Bhosle) हिने  मालिकेतील आप्पांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

या मालिकेत आप्पा आणि संजना या दोघांचं फारसं पटत नाही. आप्पांना संजनाचा स्वभाव अजिबात आवडत नाही. मात्र, पडद्यामागे या दोघांची छान मैत्री आहे. त्यामुळेच रुपालीने अभिनेता किशोर महाबोले (kishor mahabole) यांच्यासाठी खास बर्थडे पोस्ट शेअर केली आहे.

"आम्ही एकमेकांना जवळपास 14/15 वर्षे झाली ओळखत आहे. या तरुणाकडं एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे सातत्य, सदैव हसतमुख चेहरा आणि सकारात्मकता.. यांच्यासाठी वय एक फक्त एक नंबर आहे. आणि हो त्यांनी ते वेळोवेळी सिद्ध देखील केलं आहे. @kishormahabole KISHU असे चमकत राहा. अशीच सकारात्मक उर्जा पसरवत राहा आणि तुमच्यातील लहान मुलाला असंच जिवंत ठेवा..  I love you aaapppppaaaaa.., असं म्हणत रुपालीने ही पोस्ट शेअर केली आहे.

दरम्यान, रुपालीने ही पोस्ट शेअर करण्यासोबतच काही फोटोदेखील शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोघंही हटके अंदाजात दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर रुपालीची ही पोस्ट व्हायरल होत असून अनेक जण त्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

Web Title: actress rupali bhosle write post co actor kishor mahabole birthday