जुळ्या मुलींच्या जन्मानंतर दोनच महिन्यात अभिनेत्री Slim And Trim! ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 10:09 IST2024-01-31T10:07:42+5:302024-01-31T10:09:20+5:30

रुबिना अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी अभिनयासोबतच तिच्या जबरदस्त फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.

Actress Rubina dilaik Weight Loss Journey In 2 months After Delivery Shocked Fans | जुळ्या मुलींच्या जन्मानंतर दोनच महिन्यात अभिनेत्री Slim And Trim! ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क

जुळ्या मुलींच्या जन्मानंतर दोनच महिन्यात अभिनेत्री Slim And Trim! ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध  अभिनेत्री  रुबिना दिलैक (Rubina Dilaik) आणि अभिनेता अभिनव शुक्ला (Abhinav Shukla) हे आई-बाबा झाले आहेत. रुबिना दिलैकनं २७ नोव्हेंबर रोजी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला होता. अभिनव आणि रुबिना त्यांचा मुलींचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात.  आता रुबिनापुन्हा चर्चेत आली आहे ती तिच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे.

रुबिना अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी अभिनयासोबतच तिच्या जबरदस्त फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.  केवळ दोन महिन्यात रुबिनाने वजन कमी केले असून आपला फोटो शेअर केला आहे. रुबिनाचा हा लुक पाहून तिच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. तिनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती अगदी सुंदर दिसत आहे. फोटोत रुबिना एखाद्या राजकुमारीपेक्षा कमी दिसत नाहीये.

गरोदरपणात जसं सर्व महिलांसोबत घडतं, तसंच रुबिनासोबतही झालं. आई होण्यासोबतच रुबिनाचे वजनही खूप वाढलं होतं. संपूर्ण प्रेगन्सीदरम्यान रुबिना काम करत होती तर अगदी शेवटच्या दिवसापर्यंत रुबिनादिशा सोशल मीडियावरही अ‍ॅक्टिव्ह होती. मात्र आता रुबिनने अगदी दोन महिन्यात वजन कमी करून सर्वांनाच धक्का दिला आहे. काही दिवसांपुर्वी तिनं आपल्या डिलिव्हरीनंतर स्वत: वजन कमी कसे केले आणि कशी फिट झाली, याचा खुलासा केला.

पोस्टमध्ये तिनं लिहलं होतं, 'माझ शरीर हेच माझ मंदिर आहे, असे जेव्हा मी म्हणाले होते. तेव्हा अनेकांनी मला ट्रोल केलं. पण मला त्याचा त्रास झाला नाही. फक्त या जाणीवेमुळे मी गर्भधारणा ते प्रसुती हा प्रवास सहजतेने पार पाडला. कारण माझ शरीर किती मौल्यवान आहे, याची जाणीव आहे'. तिच्याकडे पाहून तिने दोन महिन्यांपुर्वीच जुळ्या मुलींना जन्म दिला आहे असं कोणीच म्हटणार नाही, इतकी ती फिट दिसून येतेय.

Web Title: Actress Rubina dilaik Weight Loss Journey In 2 months After Delivery Shocked Fans