"असं कधीही वाटलं नव्हतं...", प्राजक्ता माळीची ती पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 16:38 IST2023-01-20T16:30:51+5:302023-01-20T16:38:17+5:30

प्राजक्ता पुन्हा एकदा चर्चेत आलीय ती सोशल मीडियावरील पोस्टमुळे.

Actress Prajakta Mali got new award | "असं कधीही वाटलं नव्हतं...", प्राजक्ता माळीची ती पोस्ट चर्चेत

"असं कधीही वाटलं नव्हतं...", प्राजक्ता माळीची ती पोस्ट चर्चेत

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सातत्याने चर्चेत येत असते. कधी ती सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येते तर कधी पोस्टमुळे. आता ती पुन्हा चर्चेत आली आहे तेही सोशल मीडियावरील  पोस्टमुळे. 

प्राजक्ता माळी हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. कष्टाचं चीज व्हायला सुरूवात झाली असं म्हणायला हरकत नाही…बक्षिस… #महाराष्ट्राचाfavouriteकोण #mfk #पांडू. भरभरून votes दिल्याबद्दल सबंध महाराष्ट्राचे मनापासून आभार . असचं अविरत प्रेम आणि अखंड पाठिंबा आणि आशिर्वाद असू देत, हीच विनंती. मला खलनायिका म्हणून मिळेल काम करायला मिळेल असं कधीही वाटलं नव्हतं, त्यात हा पुरस्कार मिळाला.. त्यामुळे विशेष आनंद….
@zeestudiosofficial , माझे सर्व सहकलाकार, तंत्रज्ञ, team पांडू आणि ज्यांनी मला ह्या भूमिकेसाठी निवडल ते म्हणजे @vijumaneofficial ह्यांचे विशेष आभार.. प्राजक्ताच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

 प्राजक्ताने अलीकडेच नवीन पर्वाला सुरुवात करत असून 'प्राजक्तराज' हा पारंपरिक मराठी साज घेऊन ती आपल्या समोर आली आहे. अस्सल मराठमोळ्या अलंकारांची श्रीमंती, पारंपरिक, घरंदाज आभूषणांच्या या नवीन शृंखलेच्या वेबसाईटचे; महाराष्ट्राचे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि कला- इतिहासप्रेमी राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच अनावरण करण्यात आले

Web Title: Actress Prajakta Mali got new award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.