Prajakta Mali : घरातील ‘तो’ फोटो शेअर करत प्राजक्ता माळीची पोस्ट, म्हणाली,“२ कोपरे कौतूकानं..”
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 15:28 IST2023-03-16T14:51:53+5:302023-03-16T15:28:03+5:30
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेल्या प्राजक्ताचे लाखो फॉलोअर्स आहेत

Prajakta Mali : घरातील ‘तो’ फोटो शेअर करत प्राजक्ता माळीची पोस्ट, म्हणाली,“२ कोपरे कौतूकानं..”
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Marathi Actress Prajakta Mali ) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेल्या प्राजक्ताचे लाखो फॉलोअर्स आहेत. अनेकजण तिच्यावर अक्षरश: फिदा आहेत. प्राजूने एखादी पोस्ट केली रे केली की ती क्षणात व्हायरल होते. प्राजक्ता सोशल मीडियावर रोज नवे फोटो शेअर करत असते. नुकतीच प्राजक्ताची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
प्राजक्ताने आजवर आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर अनेक पुरस्कार मिळवलं आहेत. तिच्या घरातील एक कोपऱ्यात तिनं आजवर मिळालेल सारे पुरस्कार ठेवलं आहेत. नुकताच प्राजूला झी युवा सन्मान २०२३’ या पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आलं. ‘तेजस्वी चेहरा’ हा पुरस्कार देऊन प्राजक्ताचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर प्राजक्ता काहीशी भावूक झाली आहे, पुरस्कार मिळाल्यानंतर तिने काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत पोस्ट लिहिली आहे.
प्राजक्ताची पोस्ट
''घरातले २ कोपरे कौतूकानं भरत चाललेत ह्याचा खूप आनंद आहे…(फोटोत दुसरा दिसत नाहीये.) परवा “झी युवा सन्मान २०२३ तेजस्वी चेहरा पुरस्कार” मिळाला. पाठीवर कौतुकाची थाप मिळाली की प्रोत्साहन मिळतं, उत्साह वाढतो..#कृतज्ञ #आनंद #धन्यवाद.श्रेय- आई- वडील, ध्यान, प्राणायाम, योगा आणि हास्यजत्रेला..'', असं कॅप्शन तिनं या फोटोंना दिलं आहे.
प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत तिचं अभिनंदन केलं आहे. अनेकांनी प्राजक्ताला शुभेच्छाही दिल्या आहेत. प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोच्या सूत्रसंचालनात व्यस्त आहे.