सुशांत सिंग राजपूतसोबत झळकलेली अभिनेत्री पूजा गौर ब्रेकअपमुळे आलीय चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 13:48 IST2020-12-18T13:48:15+5:302020-12-18T13:48:44+5:30
अभिनेत्री पूजा गौर ब्रेकअपमुळे चर्चेत आली आहे.

सुशांत सिंग राजपूतसोबत झळकलेली अभिनेत्री पूजा गौर ब्रेकअपमुळे आलीय चर्चेत
अभिनेत्री पूजा गौर ब्रेकअपमुळे चर्चेत आली आहे. तिचे बॉयफ्रेंड राज सिंग अरोरासोबत ब्रेकअप झाले आहे. सोशल मीडियावर तिने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पूजा गौरने आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमुळे चर्चेत असते.
ब्रेकअपचे वृत्त कन्फर्म करत पूजा गौर म्हणाली की, राजसोबत असलेल्या माझ्या नात्याबद्दल बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. मी काहीही सांगण्याआधी थोडा वेळ मला हवा होता.
पूजा गौर आणि राज सिंग अरोरा बऱ्याच काळापासून रिलेशनशीपमध्ये होते. सोशल मीडियावर दोघांचे फोटो खूप व्हायरल व्हायचे. दोघांचे वेगळे होण्याचे वृत्त ऐकून चाहते खूप नाराज झाले आहेत.
पूजाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने एकापेक्षा एक दमदार मालिकेत काम केले आहे. तिने २००९ साली मोहब्बत है मालिकेतून करिअरला सुरूवात केली होती. या मालिकेत ती सहायक भूमिकेत होती. पूजाला खरी ओळख मन की आवाज प्रतिज्ञा मालिकेतून ओळख मिळाली होती. ही मालिका तिच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरला होता. ही मालिका २०१२ ला प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आणि ही मालिका ३ वर्षे चालली होती.
ती सावधान इंडियाचा शो होस्ट करताना दिसली होती. त्यानंतर तिने खतरों के खिलाडी या रिएलिटी शोमध्येही सहभागी झाली होती. याशिवाय पूजा एक नई उम्मीद रोशनी, प्यार तुने क्या किया, किचन चॅम्पियन ५ या शोमध्ये दिसली आहे.
पूजाने सुशांत सिंग राजपूत अभिनीत केदारनाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. यात ती सारा अली खानच्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेत झळकली होती.