बिग बॉस मराठीच्या ex स्पर्धकाने केला हिंसेचा जाहीर निषेध, नेटकऱ्यांना आठवलं सीझन २ चं भयानक प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 11:16 IST2024-09-13T11:15:08+5:302024-09-13T11:16:03+5:30
बिग बॉस मराठीच्या घरात निक्की तांबोळीला आर्याने कानफडात मारल्याचं प्रकरण तापलं असताना बिग बॉस मराठीची माजी स्पर्धक नेहा शितोळेने तिचं मत व्यक्त केलंय (bigg boss marathi 5)

बिग बॉस मराठीच्या ex स्पर्धकाने केला हिंसेचा जाहीर निषेध, नेटकऱ्यांना आठवलं सीझन २ चं भयानक प्रकरण
बिग बॉस मराठीच्या घरातलं वातावरण काल चांगलंच तापलेलं दिसलं. आर्याने टास्क खेळताना काल निक्कीच्या कानफडात लगावली. त्यामुळे निक्की ढसाढसा रडायला लागली. याशिवाय टास्क खेळताना हिंसक झाल्याने सर्वांनी आर्याला चांगलंच फैलावर घेतलं. आता या प्रकरणाला कोणतं वळण मिळणार हे आजच्या भागात पाहायला मिळेल. अशातच बिग बॉस मराठीची माजी स्पर्धक आणि अभिनेत्री नेहा शितोळेने या प्रकरणावर पोस्ट केलीय.
नेहाने बिग बॉसमधील हिंसेचा केला निषेध
नेहा शितोळेने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केलीय. त्यात ती लिहिते, "कोणीही कुठल्याही कारणांनी कुणाच्याही बाबतीत केलेली जाणीवपूर्वक हिंसा निंदनीयच आहे... हा खेळ फक्त शारीरिकरित्या सक्षम राहून खेळण्याचा नाही... जिंकण्यासाठी मनाने खंबीर आणि संतुलित असणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे..." अशी पोस्ट नेहाने केली आहे. नेहाची ही पोस्ट वाचून लोकांना तिच्यासोबत घडलेलं जुनं प्रकरण आठवलंय.
नेहा आणि पराग कान्हेरेमध्ये झालेली शारीरिक हिंसा
नेहाने ही पोस्ट करताच लोकांना तिच्यासोबत घडलेलं बिग बॉस मराठी २ चं प्रकरण आठवलंय. या प्रकरणात बिग बॉस मराठी २ मध्ये सहभागी असलेला शेफ पराग कान्हेरे आणि नेहा शितोळे या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा झाली होती. त्यावेळी परागला बिग बॉसमधून बाहेर काढण्यात आलं होतं. परागला एक संधी पुन्हा दिली गेली होती. परंतु घरातील इतर सदस्य परागला घरात येऊ न देण्यावर ठाम होते. त्यामुळे परागचा बिग बॉस मराठी २ मधला प्रवास अर्ध्यावर संपला होता. नवीन सीझनमध्ये आर्या आणि निक्कीमध्ये झालेल्या हिंसेत बिग बॉस निक्कीला काय शिक्षा ठोठावणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.