सून माझी लाडाची! शिवानी रांगोळेसाठी सासूबाईंनी लिहिली खास पोस्ट; म्हणाल्या-"मोठी हो, पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 16:00 IST2025-10-28T15:52:05+5:302025-10-28T16:00:04+5:30
"तू आमच्या आयुष्यात आलीस अन्…", अभिनेत्री शिवानी रांगोळेबद्दल सासूबाई काय म्हणाल्या?

सून माझी लाडाची! शिवानी रांगोळेसाठी सासूबाईंनी लिहिली खास पोस्ट; म्हणाल्या-"मोठी हो, पण..."
Mrinal Kulkarni Post: सासू आणि सुनेचं नातं हे वेगळंच असतं. सासूला आनंदी ठेवण्याचं काम हे केवळ सुनेचं नाही तर सासूकडूनही तितकाच प्रयत्न व्हायला हवा. अनेक ठिकाणी सासू आईपेक्षा जास्त लळा लावून प्रेरणादायी उदाहरण बनते.अशातच मराठी कलाविश्वातील अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे ही सासू-सूनेची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. त्यांच्या बॉण्डिंगचीही अनेकदा चर्चा होताना असते. आज शिवानी रांगोळेचा वाढदिवस आहे. याचनिमित्ताने सासूबाईंनी लाडक्या सूनेसाठी खास पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांनी मालिकांमध्येही एकत्र काम केलं आहे. त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री जितकी रसिकांना आवडते. त्याच पद्धतीने त्यांची ऑफस्क्रिन केमिस्ट्री देखील कमाल आहे. आज लाडक्या सूनेच्या वाढदिवसानिमित्त मृणाल यांनी तिच्याबद्दल प्रेम व्यक्त करत पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलंय, "प्रिय शिवानी ,एखादी वाऱ्याची झुळूक यावी तशी तू आमच्या आयुष्यात आलीस.. तुझं खळाळून हसणं, जरा वेळ मिळाला की "घर घर" खेळणं, घरातल्या सगळ्यांची काळजी घेणं , तुझी गोड चिवचिव आणि मुख्य म्हणजे मी जास्त उद्योग केले की मलादेखील दटावण . हे सगळं आम्हाला फार फार आवडतं."तुला शिकवीन चांगलाच धडा " नंतर मिळालेला हा ब्रेक तू छान एन्जॉय केलास. तू आपल्या कुटुंबाशी एकरूप झाली आहेस हे पाहून खूप बरं वाटतं.. "कोहम" या गोनिदांच्या कादंबऱ्यांवर आधारित नाट्यमय अभिवाचनासाठी तुझं भरपूर कौतुक होत आहे याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो."
यापुढे मृणाल यांनी शिवानीला खास सल्ला देत म्हटलंय, "आता तुझं नवं नाटक येणार ."शंकर _जयकिशन " भरत जाधव आणि महेश मांजरेकर या दिग्गज कलावंतांबरोबर तू तशीच ताकतीने उभी राहशील यात आम्हाला बिलकुल शंका नाही.भरपूर कष्ट कर ,मोठी हो पण तुझ्या चेहऱ्यावरचं गोड हसू असंच राहू देत.. आम्हाला आमच्या सुनेकडून मिळते आहे तसेच सुख तुझ्या आईबाबांना त्यांच्या जावयाकडून देखील मिळेल याची खात्री आहे मला !! तुम्हा दोघांनाही खूप खूप प्रेम…". अशा भावना मृणाल यांनी या पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहेत.