ग्लॅमरच्या दुनियेतील राणी आली! 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात सोनाली राऊतची एन्ट्री, रितेशसोबत केलंय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 20:55 IST2026-01-11T20:54:30+5:302026-01-11T20:55:24+5:30
सोनाली राऊतने बिग बॉस मराठी ६ च्या घरात शानदार एन्ट्री केली आहे. कोण आहे ती? जाणून घ्या

ग्लॅमरच्या दुनियेतील राणी आली! 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात सोनाली राऊतची एन्ट्री, रितेशसोबत केलंय काम
'बिग बॉस मराठी ६'चा ग्रँड प्रिमिअर कलर्स मराठीवर सुरु आहे. सर्वांना या नव्या सीझनची गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. अशातच 'बिग बॉस मराठी ६' मध्ये स्पर्धक म्हणून कोण कोण दिसणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अशातच या नव्या सीझनमध्ये अभिनेत्री आणि मॉडेल सोनाली राऊतची एन्ट्री झाली आहे. सोनालीच्या ग्लॅमरस एन्ट्रीने प्रेक्षकांमध्ये या नव्या सीझनविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
'बिग बॉस मराठी ६'मध्ये सहभागी झालेला सोनाली राऊत ही अभिनेत्री असून तिने बॉलिवूड सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. ग्रेट ग्रँड मस्ती, द एक्सपोज या सिनेमांमध्ये सोनाली झळकली. इतकंच नव्हे सोनालीने ग्रेट ग्रँड मस्ती सिनेमात रितेश देशमुखसोबत काम केलं. आता रितेश होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस मराठी ६'मध्ये सोनाली सहभागी झाली आहे. सोनालीचे या नव्या सीझनमध्ये तिच्या ग्लॅमरचा तडका नक्कीच लावेल यात शंका नाही.
सोनाली राऊतबद्दल आणखी सांगायचं तर, ती बिग बॉस हिंदीच्या ८ व्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. या सीझनमध्ये सोनाली ७ व्या नंबरची विजेती होती. याशिवाय सोनालीने रणवीर सिंगसोबत केलेलं फोटोशूटही चांगलंच गाजलं होतं. प्रसिद्ध गायक शानसोबत सोनाली काही संगीत व्हिडीओमध्ये झळकली आहे. एकूणच सोनाली घरात आल्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.