देनेवाला जब भी देता, देता छप्परफाड के...; माधुरी पवारचं टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक, एकाच वेळी दोन शोची लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 15:20 IST2025-04-11T15:20:17+5:302025-04-11T15:20:44+5:30

पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवण्यासाठी माधुरी सज्ज झाली आहे. माधुरीला एक नव्हे तर दोन प्रोजेक्टची लॉटरी लागली आहे.

actress madhuri pawar to seen in shitti vajali re and yed lagal premach star pravah serial | देनेवाला जब भी देता, देता छप्परफाड के...; माधुरी पवारचं टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक, एकाच वेळी दोन शोची लॉटरी

देनेवाला जब भी देता, देता छप्परफाड के...; माधुरी पवारचं टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक, एकाच वेळी दोन शोची लॉटरी

'तुझ्यात जीव रंगला', ‘देवमाणूस’, ‘रानबाजार’, 'अल्याड पल्याड', 'लंडन मिसळ' या कलाकृतींमुळे अभिनेत्री माधुरी पवार घराघरात पोहोचली. अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्तम नृत्यांगणादेखील आहे. माधुरीने सिनेमांमध्ये काम केलं आहे. आता पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवण्यासाठी माधुरी सज्ज झाली आहे. माधुरीला एक नव्हे तर दोन प्रोजेक्टची लॉटरी लागली आहे. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या शोमधून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. 

नुकतंच स्टार प्रवाह वाहिनीवरील 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत माधुरीची एन्ट्री झाली आहे. यात ती खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर याबरोबरच स्टार प्रवाहवरील 'शिट्टी वाजली रे' या सेलिब्रिटी कुकिंग शोमध्येदेखील माधुरी तिचं पाककौशल्य दाखवणार आहे. याचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 


या दोन नव्या प्रोजेक्ट विषयी सांगताना माधुरी म्हणाली, “देनेवाला जब भी देता…देता छप्पर फाडके अशी माझी सध्याची भावना आहे. माझ्याकडे काही चित्रपट व सीरीज असल्या कारणाने मी गेले २ वर्ष टीव्ही मालिका केलेली नाही. मालिकांचं आणि माझं जवळचं नात आहे. अप्सरा आली हा डान्स रिएलिटी शो जिंकल्यानंतर मी 'तुझ्यात जीव रंगला' तसेच 'देवमाणूस' या सीरियल केल्या. मला मालिका आवडतात. कारण मालिकांमुळे आपण घराघरात दररोज पोहचतो. आपलं काम लोकांपर्यंत पोहोचतं”.


पुढे ती सांगते, “मी आता दोन्हीकडे शूट करत आहे. स्टार प्रवाह वर 'येड लागलं प्रेमाचं' आणि 'शिट्टी वाजली रे' हे शोज मी करत आहे. 'येड लागलं प्रेमाचं' या सीरियल मध्ये मी निकी हा नेगेटिव्ह रोल करत आहे. ही भूमिका बिनधास्त, नीडर आणि रावडी आहे. तर 'शिट्टी वाजली रे' या रिएलिटी शोमध्ये धम्माल मस्ती करताना मी तुम्हाला दिसणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट मध्ये मी वेगवेगळ्या भूमिकेत तुमच्या भेटीला येणार आहे. माझा सगळ्या प्रेक्षकांवर विश्वास आहे की तुम्ही हे कार्यक्रम नक्की बघणार. तुमचं प्रेम कायम असंच राहो हीच सदीच्छा!”

Web Title: actress madhuri pawar to seen in shitti vajali re and yed lagal premach star pravah serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.