"लवकर या आणि रात्री...", प्रसिद्ध अभिनेत्री ३७ व्या वर्षी करतेय लग्न, निमंत्रण पत्रिका चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 16:55 IST2026-03-10T16:50:20+5:302026-03-10T16:55:29+5:30
सध्या मनोरंजन विश्वात एका अभिनेत्रीच्या लग्नाची चांगलीच चर्चा आहे. ही ३७ वर्षीय अभिनेत्री प्रसिद्ध अभिनेता आणि समालोचकासोबत लग्न करणार आहे.

"लवकर या आणि रात्री...", प्रसिद्ध अभिनेत्री ३७ व्या वर्षी करतेय लग्न, निमंत्रण पत्रिका चर्चेत
Celebrity Wedding: सध्या मनोरंजन विश्वात एका अभिनेत्रीच्या लग्नाची चांगलीच चर्चा आहे. ही ३७ वर्षीय अभिनेत्री प्रसिद्ध अभिनेता आणि समालोचकासोबत लग्न करणार आहे. ही अभिनेत्री आहे कृतिका कामरा. कृतिका आणि गौरव कपूर एकमेकांशी लवकरच लग्न करणार आहेत. यावेळी गौरव आणि कृतिकाच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही पत्रिका पाहून सर्वजण चकीत झाले आहेत.
अभिनेत्री कृतिका कामरा आणि गौरव कपूर यांच्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या दोघांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली देत नातं जगजाहिर केलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांचा विवाह सोहळा ११ मार्च रोजी मुंबईत पार पडणार आहे. हा सोहळा अत्यंत खासगी स्वरूपाचा असेल, ज्यामध्ये केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित राहतील.

आफ्टर-पार्टीचे खास आकर्षण
या लग्नाच्या पत्रिकेतील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे लग्नानंतर आयोजित करण्यात आलेली 'आफ्टर-पार्टी'. मिडिया रिपोर्टनुसार, ११ मार्च रोजी गौरवच्या वांद्रे इथल्या घरी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीनं हा सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर १२ मार्चला कृतिका आणि गौरवच्या मित्र-मैत्रिणींसाठी एका खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्टीत चित्रपट आणि क्रीडा जगतातील दिग्गज कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
पत्रिकेतील 'तो' खास संदेश
पत्रिकेवर 'द पार्टी, आफ्टर' (The Party, After) असे लिहित या जोडीने एक गोड संदेशही दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, "आम्हाला आमच्या लग्नाचा आनंद तुमच्यासोबत अतिशय शांतपणे आणि आरामात साजरा करायचा आहे. त्यामुळे लवकर या आणि रात्री उशिरापर्यंत आमच्यासोबत थांबा." घाईगडबड टाळून आपल्या पाहुण्यांसोबत निवांत वेळ घालवण्यासाठी त्यांनी ही खास 'आफ्टर-पार्टी' प्लॅन केली आहे.