Photo: भुवनेश्वरीचा विदेशी अंदाज; अधिपतीचं लग्न होताच गाठली अमेरिका; कारण आहे खास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 05:26 PM2023-10-08T17:26:38+5:302023-10-08T17:27:59+5:30

Kavita medhekar: अधिपतीचं लग्न होताच भुवनेश्वरीची विदेशवारी; कविता मेढेकर यांची अमेरिकेत भटकंती

actress-kavita-medhekar-went-to-america-for-eka-lagnachi-pudhchi-goshta-natak | Photo: भुवनेश्वरीचा विदेशी अंदाज; अधिपतीचं लग्न होताच गाठली अमेरिका; कारण आहे खास

Photo: भुवनेश्वरीचा विदेशी अंदाज; अधिपतीचं लग्न होताच गाठली अमेरिका; कारण आहे खास

googlenewsNext

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे 'तुला शिकवीन चांगला धडा'. सध्या ही मालिका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. नुकतंच अधिपती आणि अक्षरा यांचं लग्न झालं आहे. त्यामुळे सध्या सूर्यवंशी कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. मात्र, अभिनेत्री कविता लाड-मेढेकर (kavita lad-medhekar) यांनी साकारलेल्या भुवनेश्वरी या भूमिकेला विशेष लोकप्रियता मिळत आहे. यामध्येच आता कविता मेढेकर सध्या अमेरिकेला रवाना झाल्याचं दिसून येत आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या कविता यांनी इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोवरुन त्या अमेरिका दौऱ्यावर असल्याचं लक्षात येतं. विशेष म्हणजे त्यांचा हा दौरा एका खास कारणामुळे होत आहे. रंगमंच दणाणून सोडलेलं एका लग्नाची पुढचा गोष्ट या नाटकाचे सध्या अमेरिकेत प्रयोग होत आहेत. त्यामुळे त्या अमेरिकेला गेल्या आहेत. 

प्रशांत दामले आणि कविता मेढेकर यांचं 'एका लग्नाची पुढची गोष्ट' हे नाटक चांगलंच सुपरहिट ठरलं आहे. आतापर्यंत या नाटकाचे असंख्य प्रयोग झाले असून संपूर्ण देशभरात हे नाटक गाजल्यानंतर त्याचे विदेशात प्रयोग सुरु झाले आहेत. त्यामुळे या नाटकाची सगळी टीम सध्या अमेरिकेत आहे.

दरम्यान, अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांमध्ये या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. त्यामुळे जवळपास महिनाभर या नाटकाची टीम अमेरिकेत राहणार आहे.

Web Title: actress-kavita-medhekar-went-to-america-for-eka-lagnachi-pudhchi-goshta-natak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.