"या सीझनमध्ये तरी मी जात नाही, कारण...",'बिग बॉस मराठी'मध्ये सहभागी होण्याच्या चर्चा, मराठी अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 11:14 IST2026-01-06T11:09:26+5:302026-01-06T11:14:23+5:30
'बिग बॉस मराठी'मध्ये सहभागी होण्याच्या चर्चा, मराठी अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं, म्हणते-"खूप लोकांचे मला कॉल्स आणि मेसेज..."

"या सीझनमध्ये तरी मी जात नाही, कारण...",'बिग बॉस मराठी'मध्ये सहभागी होण्याच्या चर्चा, मराठी अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं
Marathi Actress Reaction On Bigg Boss Marathi Season 6: सध्या प्रेक्षकांमध्ये बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाबद्दल अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. बिग मराठीचं पाचवं पर्व हे खूप गाजलं होतं. त्यानंतर सहाव्या पर्वाची घोषणा केल्यानंतर हा रिअॅलिटी शो कधी भेटीला येणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. अखेरीस येत्या ११ जानेवारीपासून हा शो कलर्स मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे. अभिनेता रितेश देशमुख यंदाच्या पर्वाचा होस्ट असणार आहे. त्यामुळे सगळीकडे उत्साहाची लाट उसळली आहे. मागचा सीझन वाजवलाय,यंदाचा गाजवायचाय... आहात ना तय्यार... रितेशच्या या वाक्याने प्रेक्षकांची धडधड वाढली आहे.
दरम्यान, बिग बॉस मराठीची घोषणा झाल्यापासून या शोमध्ये कोणते स्पर्धक दिसतील याविषयी चर्चा रंगली आहे.सोशल मीडियावरही वेगवेगळे तर्क-वितर्क लावण्यात आले आहेत. मराठीतील अनेक दिग्गज कलाकार, लावणी नृत्यांगना तसेच राजकारणात सक्रीय असणाऱ्या काही सेलिब्रिटींची नावे यावेळी चर्चेत आहेत. त्यात लोकप्रिय मराठी अभिनेत्री काजल काटेचं नाव देखील समो आलं होतं. या चर्चांवर आता अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे.
बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये कोण झळकणार, याविषयी गेले अनेक दिवस चर्चा आहे. माझी तुझी रेशीम गाठ फेम अभिनेत्री काजल काटेच्या नावाचीही सोशल मीडियावर चर्चा होती. यासंदर्भात अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत म्हटलंय, मी बिग बॉस मराठीमध्ये जात असल्याची चर्चा मला खूप आवडली. शुभेच्छा देताय त्यासाठी धन्यवाद. पण, मला इथे स्पष्ट करायला आवडेल. या सीझनमध्ये तरी मी बिग बॉस मराठीच्या घरात जात नाहीये. तुमचं प्रेम कायम ठेवा. भेटू लवकरच...", अशी पोस्ट लिहून अभिनेत्रीने बिग बॉसमध्ये सहभागी होण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
तसंच या पोस्टला कॅप्शन देत अभिनेत्रीने म्हटलंय, की-"खूप लोकांचे मला कॉल्स आणि मेसेज आले. त्यामुळे मला हे स्पष्ट करावं लागलं.लवकरच नवीन भूमिकेत भेटणार अशी इच्छा आहे. "
वर्कफ्रंट
अभिनेत्री काजल काटे ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. माझी तुझी रेशीम गाठ तसंच मुरांबा यांसारख्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.