लोकप्रिय टीव्ही कपल जॅस्मीन भसीन अन् अली गोनी याचं ठरलं? लग्नाबाबत जवळच्या व्यक्तीने दिली हिंट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 16:05 IST2026-02-02T16:02:27+5:302026-02-02T16:05:14+5:30

२०२६ मध्ये जॅस्मीन भसीन अन् अली गोनीचं शुभमंगल सावधान? जवळच्या व्यक्तीने सगळंच सांगून टाकलं 

actress jasmin bhasin and aly goni married soon abhishek kumar give hints about their wedding | लोकप्रिय टीव्ही कपल जॅस्मीन भसीन अन् अली गोनी याचं ठरलं? लग्नाबाबत जवळच्या व्यक्तीने दिली हिंट 

लोकप्रिय टीव्ही कपल जॅस्मीन भसीन अन् अली गोनी याचं ठरलं? लग्नाबाबत जवळच्या व्यक्तीने दिली हिंट 

Jasmin Bhasin And Aly Goni: टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडपे अली गोनी आणि जॅस्मीन भसीन अनेक वर्षांपासून एकत्र आहेत. 'बिग बॉस' १४ मध्ये दोघांची ओळख झाली आणि त्यांचं रिलेशनशिप सुरु झालं. काही वर्षांच्या डेटिंगनंतर दोघं लिव्ह-इनमध्ये राहायला लागले.  या दोघांची भेट २०१८ साली आलेल्या खतरों के खिलाडी चित्रपटाच्या शोमध्ये झाली होती, त्यानंतर मैत्री आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मात्र,ही जोडी खऱ्या आयुष्यात कधी एकत्र येणार असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. याबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

अलिकडेच जॅस्मीन  भसीन आणि अली गोनी यांनी लोकप्रिय टीव्ही अभिनेता अभिषेक कुमारला त्यांच्या घरी आमंत्रित केलं होतं. याचा व्लॉग त्यांनी शेअर केला आहे.  
या व्लॉगमध्ये पाहायला मिळतंय की, अभिषेक हा जास्मिन भसीन आणि अली गोनी यांच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश करताच त्याने गमतीने लिफ्ट खूप लहान असल्याचे म्हटलं. 
यावेळी अभिषेक त्यांच्या घरी भेटवस्तू घेऊन पोहोचला. त्यादरम्यान तो म्हणतो, हे खूप कष्टाचं काम होतं आणि जास्मिन वहिनीने आमचं कौतुक केलं.

अभिषेकचं ते बोलणं ऐकून जॅस्मीन त्याला म्हणते," मला वहिनी का म्हणतोय... यावर अभिषेक उत्तर देतो, "आता तर तू माझी वहिनीच झालीस, अभिषेक उत्तर देतो,जर यावर्षी  तूम्ही लग्न केलंत तर तू माझी वहिनी होशील." अभिषेकच्या वक्तव्याने चाहते आता जस्मीन आणि अली गोनीच्या लग्नाबद्दल हिंट मिळाली आहे. शिवाय अनेकजण आता या कपलच्या लग्नाबद्दल तर्कवितर्क लावत आहेत.

Web Title : जैस्मीन भसीन और अली गोनी की शादी? करीबी दोस्त ने दिया संकेत।

Web Summary : लोकप्रिय टीवी कपल जैस्मीन भसीन और अली गोनी जल्द ही शादी कर सकते हैं! वर्षों की डेटिंग के बाद, अभिनेता अभिषेक कुमार ने हाल ही में उनके घर पर आने के दौरान उनकी आगामी शादी की योजनाओं का संकेत दिया, जिससे प्रशंसकों के बीच अटकलें तेज हो गईं।

Web Title : Jasmin Bhasin and Aly Goni's wedding? Close friend drops hint.

Web Summary : Jasmin Bhasin and Aly Goni, a popular TV couple, may be getting married soon! After years of dating, actor Abhishek Kumar hinted at their upcoming wedding plans during a recent home visit, sparking fan speculation.