भावुक डोळे, उदास चेहरा अन्...; कॅन्सरशी लढणाऱ्या हिना खानची अवस्था पाहून चाहते चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 13:05 IST2024-07-14T13:03:28+5:302024-07-14T13:05:56+5:30
हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत असून तिने शेअर केलेले नवीन फोटो पाहताच तुम्हीही व्हाल भावुक (hina khan)

भावुक डोळे, उदास चेहरा अन्...; कॅन्सरशी लढणाऱ्या हिना खानची अवस्था पाहून चाहते चिंतेत
अभिनेत्री हिना खान सध्या चांगलीच चर्चेत आहे. हिनाने काहीच दिवसांपूर्वी तिला झालेल्या ब्रेस्ट कॅन्सरबद्दल सांगितलं. हिनाच्या कॅन्सरची बातमी कळताच तिचे चाहते चिंतेत पडले. सर्वजण हिनाला धीर देत आहेत. हिनाने सोशल मीडियावर ती उपचार घेत असल्याचंही सांगितलं. इतकंच नव्हे, ती चाहत्यांसोबत विविध अपडेट्स शेअर करत असते. अशातच हिनाची नवी पोस्ट पाहून तिचे चाहतेही भावूक झाले आहेत. हिनाने आईला मिठी मारतानाचे फोटो शेअर केलेत.
आईला मिठी मारत हिनाची भावूक पोस्ट
हिनाने आईला मिठी मारतानाचे काही कलर आणि काही ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केलेत. हे फोटो शेअर करत हिना लिहिते, "दुःखाचे महासागर असतील किंवा वेदना असतील, आईचे हृदय तिच्या मुलांना यातून मार्ग काढण्यासाठी निवारा आणि प्रेम पुरवते. याच दिवशी आईला माझ्या कॅन्सरबद्दलची बातमी कळाली. तिलाही याचा धक्काच बसला तरीही तिने मला मिठी मारली अन् स्वतःचे दुःख विसरली. आईकडे नेहमीच एक सुपरपॉवर असते. तिचं जगही या बातमीने उद्धवस्त झालंय तरीही तिच्या मिठीत घेऊन तिने मला धीर दिलाय."
हिनाला वेदना असह्य
कॅन्सरशी झुंज देत असलेली अभिनेत्री हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. नुकताच हिनाने तिचे केस कापतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. आता बुधवारी रात्री तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक नवीन पोस्ट शेअर केली. ती पोस्ट पाहून हिनाला असह्य वेदनांना सामोरं जावं लागत असल्याचं दिसतंय. हिना खानने इंस्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन हिना लिहिते- "अल्लाहशिवाय कोणीही तुमचे दुःख दूर करू शकत नाही. प्लीज अल्लाह, प्लीज."