प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लेकीचा लग्नसोहळा, सर्वात सुंदर वधू म्हणत शेअर केले फोटो; ओळखलंत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 16:02 IST2026-02-26T16:02:09+5:302026-02-26T16:02:47+5:30
लेकीच्या लग्नात अभिनेत्री भावुक

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लेकीचा लग्नसोहळा, सर्वात सुंदर वधू म्हणत शेअर केले फोटो; ओळखलंत का?
रामानंद सादर यांच्या 'रामायण' मालिकेत माता सीतेच्या भूमिकेत दिसलेल्या अभिनेत्री दीपिका चिखलिया चर्चेत आल्या आहेत. त्यांची मुलगी जुही लग्नबंधनात अडकली आहे. लेकीच्या लग्नाची झलक त्यांनी स्वत: इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत दाखवली आहे. गोल्डन रंगाच्या लेहेंग्यात नवी नवरी सजलेली दिसत आहे. या आनंदाच्या प्रसंगी दीपिका चिखलिया भावुक झाल्या.
दीपिका चिखलिया यांनी व्हिडीओ पोस्ट करत लेकीला आशीर्वाद दिला आहे. जुहीचा गोल्डन लेहेंग्यातील फोटो त्यांनी आधी दाखवला. लेहेंग्यावर बारीक नक्षीकाम आहे. गळ्यात भरजरी हार, कपाळावर बिंदी, नथ, हातात सोन्याच्या बांगड्या अशा सोने-हिरेजडित दागिन्यांनी ती मढलेली दिसत आहे. नंतर जुही आणि तिचा पती गळ्यात वरमाला घालून उभे आहेत आणि आजूबाजूला बरेच कुटुंबीय उपस्थित आहेत. 'सर्वात सुंदर वधू' असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.
दीपिका चिखलिया यांना सगळे सीता म्हणूनच ओळखतात. त्या काळी रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेची खूप चर्चा असायची. मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने टीव्हीसमोर येऊन बसायचे. अरुण गोविल यांना प्रेक्षक खरोखरच श्रीरामच समजत होते. ते कुठे दिसले तर लोक अक्षरश: त्यांच्या पाया पडायचे. तर दीपिका चिखलिया यांनाही लोकांनी माता सीताच मानलं होतं.
दीपिका चिखलिया यांनी १९९१ साली बिझनेसमन हेमंत टोपीवाला यांच्याशी लग्न केलं. त्यांना दोन मुली आहेत. दोन्ही मुली प्रसिद्धीझोतापासून दूर आहेत. एक मुलगी निधी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे. तर जुहीने फॅमिली बिझनेसमध्येच आहे.